Download App

Sanya Malhotra: सान्या मल्होत्राचा ‘मिसेस’ चित्रपट पोहचला हवाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

  • Written By: Last Updated:

Sanya Malhotra : अभिनेत्री सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra ) ‘दंगल’ सिनेमामुळे नावारूपाला आली. ‘दंगल’नंतरही तिने अनेक सिनेमामध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारल्या. तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर चाहत्यांची वाहवा मिळवली. आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. सान्याही सोशल मीडियावर (social media) सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तर आता अभिनेत्रींच्या ‘मिसेस’ (Mrs Movie) चित्रपट हवाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival) पोहचला आहे.

अभिनेत्री सान्या मल्होत्राचा आगामी चित्रपट ‘मिसेस’ 2024 च्या हवाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (HIFF) प्रदर्शित करण्यात येणार आहे. सान्या या चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारणार असून संपूर्ण चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब असणार आहे. लेखिका चित्रपट निर्मात्या आरती कडव दिग्दर्शित, ‘मिसेस’, जो मल्याळम चित्रपट ‘द ग्रेट इंडियन किचन’ चा रिमेक असणार आहे.

सान्या मल्होत्राने एक पात्र साकारले आहे जे प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे, यात काही शंका नाही. हवाई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या लाइनअपमध्ये “मिसेस” चा समावेश असणं हे नक्कीच खास आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने प्रतिभावान अभिनेत्रीच्या अष्टपैलूत्वाची सिद्धता दाखवून तिच्या उत्कृष्ट चित्रपटचित्रणातही भर घातली आहे.

बाबा सिद्दीकीच्या एका शब्दावर अख्खं बॉलिवूड हजर होतं? 2024 मध्ये इफ्तारीत होणार ‘या’ खास गोष्टी

यापूर्वी हा चित्रपट पाम स्प्रिंग्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही गेला होता. सान्या मल्होत्राचा उत्कृष्ट अभिनय, चित्रपटाच्या वेधक कथाकथन हा चित्रपट खास ठरणार आहे.

follow us