Download App

Saqib Saleem: साकिब सलीमने रचला इतिहास, पटकावला ‘पॉवरहाऊस परफॉर्मर’चा पुरस्कार

Saqib Saleem: साकिब सलीम (Saqib Saleem) अलीकडे सलमान खानसोबत (Salman Khan) ‘रेस3’मध्ये (Race 3) दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. साकिब सलीमने (Saqib Saleem) ‘क्रॅकडाउन सीझन 2’मध्ये (Crackdown Season 2) आकर्षक कामगिरीसाठी “पॉवरहाऊस परफॉर्मर” पुरस्कार पटकावला आहे.

डायनॅमिक अभिनेता आणि कलाकार साकिब सलीम याने क्रॅकडाउन सीझन 2 मधील रियाझ पठाणच्या अपवादात्मक भूमिकेसाठी मुंबईतील एका प्रतिष्ठित पुरस्कार कार्यक्रमात अलीकडेच “पॉवरहाऊस परफॉर्मर” पुरस्कार पटकावला आहे. हाय-ऑक्टेन ॲक्शन-थ्रिलर मालिकेत साकिबने कारस्थान आणि धोक्याच्या जाळ्यात अडकलेल्या रॉ एजंट रियाझ पठाणची मुख्य भूमिका साकारली आहे.

‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात तगडी स्टारकास्ट; रवी काळे साकारणार ‘बहिर्जी नाईक’ यांची भूमिका

साकिबची कामगिरी ही कमालीची होती. “क्राईम बीट,” आणि “सिटाडेल इंडिया” सारख्या आगामी उपक्रमांच्या अपेक्षेच्या दरम्यान साकिबची अनोखी भूमिका प्रत्येक प्रोजेक्ट मधून दिसून येते. साकिब हा मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.

मॉडेल म्हणून करिअरची सुरूवात : या डायनॅमिक अभिनेत्याचे काकुडा आणि क्राइम बीटमध्ये काही रोमांचक प्रकल्प आहेत जे ओटीटी रिलीजसाठी तयार आहेत. साकिब सलीम अलीकडे सलमान खानसोबत ‘रेस3’मध्ये दिसला होता. त्याची दुसरी ओळख द्यायची झाल्यास तो अभिनेत्री हुमा कुरेशी हिचा भाऊ आहे. मॉडेल म्हणून साकिबने आपल्या करिअरची सुरूवात केली. मुझसे फ्रेंडशिप करोग, मेरे डॅड की मारूति, बॉम्बे टॉकिज, हवा हवाई, ढिशुम, दिल जंगली अशा अनेक चित्रपटांत तो दिसला आहे.

follow us

वेब स्टोरीज