सारा गुरपालचा धक्कादायक खुलासा! लग्नानंतर 47 दिवस घरात डांबून ठेवलं, पतीकडून शारीरिक छळ

Sara Gurpal Domestic Abuse : पंजाबी अभिनेत्री सारा गुरपालचा लग्नानंतर झालेल्या छळाबाबत धक्कादायक खुलासा, 47 दिवस घरात डांबून ठेवल्याचा दावा.

News Photo   2026 11 23T141959.027

Sara Gurpal

Sara Gurpal Domestic Abuse : पंजाबी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सारा गुरपाल सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच ती ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. या शोमुळे तिची चांगलीच चर्चा झाली. मात्र, अभिनय आणि गायन क्षेत्रात यश मिळवण्यापूर्वी साराला आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. लग्नानंतर पतीकडून झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाचा अनुभव तिनं नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे. तब्बल 47 दिवस तिला घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं, असा गंभीर दावा तिनं केला आहे.

हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सारानं सांगितलं की, करिअर चांगल्या टप्प्यावर असतानाच तिनं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित व्यक्ती आणि त्याचं कुटुंब सुरुवातीला चांगलं वाटलं होतं. अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी तिनं पारंपरिक विवाहविधी न करता कोर्ट मॅरेज केलं होतं. ही कल्पनाही तिच्या पतीचीच होती. मात्र, अमेरिकेचा व्हिसा मिळाल्यानंतर त्याच्या वागण्यात बदल झाला. तिच्या कामावर त्यानं आक्षेप घेण्यास सुरुवात केली. अभिनेत्री म्हणून काम करणं, कॅमेऱ्यासमोर येणं किंवा म्युझिक व्हिडिओमध्ये अभिनय करणं बंद करण्याची अट त्यानं घातली होती. इतकंच नव्हे तर तिचं इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट करण्यात आलं. या दबावामुळे सारा तब्बल वर्षभर सोशल मीडियापासून दूर राहिली.

Abir Teaser : ‘अबीर’ च्या कथानकाची झलक दाखवणारा टिझर प्रदर्शित!

साराच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीचं कुटुंब अमेरिकेत राहत होतं. तिथे गेल्यानंतर पतीनं तिला स्वतःच्या रेस्टॉरंटमध्ये नोकरी करण्यास सांगितलं. मात्र, तिनं ही ऑफर नाकारल्यानंतर तिचा छळ सुरू झाला. तिला घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आणि तब्बल 47 दिवस घरातच डांबून ठेवण्यात आलं. या काळात तिला मानसिक त्रासासह शारीरिक मारहाणही सहन करावी लागली. सासरच्या घरात तिच्यावर अत्याचार होत असताना पतीकडूनही कोणताही आधार मिळाला नाही. उलट, एकदा पतीचा भाऊ रागाच्या भरात तिच्या अंगावर धावून आला. त्यावेळी पती समोर असूनही त्यानं हस्तक्षेप केला नसल्याचा खुलासा सारानं केला.

या सर्व प्रकारामुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचलेल्या सारानं अखेर पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. तिनं पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर या त्रासातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला. त्यानंतर ती भारतात परतली आणि नव्यानं आयुष्याची सुरुवात केली. वैयक्तिक आयुष्यातील या कटू अनुभवांनंतरही तिनं हार मानली नाही. पुन्हा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होत स्वतःचं करिअर उभं केलं. आज पंजाबी चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या सारानं सांगितलेला हा अनुभव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Exit mobile version