मुलगा हवा म्हणून PSI पतीकडून पत्नीचा छळ; जबरदस्ती गर्भपात, जीवे मारण्याचा आरोप
Pune Police पुण्यात मुलगा हवा म्हणून PSI पतीकडून पत्नीचा छळ; जबरदस्ती गर्भपात आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप.
Pune PSI accused of harassing wife, forcing abortion : पुण्यात कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावरच पत्नीचा छळ केल्याचा गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण, तिच्यावर मानसिक दबाव, गर्भलिंग तपासणी आणि तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचा आरोप पोलीस उपनिरीक्षक धनाजी रंगराव टोणे आणि त्यांच्या आई अनुसया टोणे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न आणि बेकायदेशीर गर्भपातासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानमध्ये ‘कॉक्रोज जनता पार्टी’च्या टीमवर हल्ला; आशुतोष रांकांना धक्काबुक्की अन् दगडफेक
धनाजी टोणे आणि संबंधित महिला यांचा विवाह 19 मे 2019 रोजी जतमध्ये झाला. लग्नानंतर काही काळातच पतीकडून पत्नीवर नोकरी करण्यासाठी दबाव आणला जाऊ लागल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर छळ आणि मारहाणीला सुरुवात झाल्याचा आरोप आहे.
2020 मध्ये महिला पहिल्यांदा गर्भवती असताना तिच्यावर मारहाण करण्यात आली. गर्भधारणेच्या सातव्या महिन्यातही तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, 27 जानेवारी 2022 रोजी धनाजी टोणे यांच्याविरोधात मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या कारवाईनंतर त्यांनी घरातील पत्नीवर राग काढल्याचा आरोप असून, तिचे डोके फरशीवर आपटून जखमी केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
गर्भलिंग तपासणीचा आरोप
पुण्यात धनाजी टोणेची बदली झाल्यानंतर मार्च 2025 मध्ये महिला पुन्हा गर्भवती झाली. 13 मे रोजी धनाजी टोणे आणि त्यांच्या आईने तिला एका शेतातील घरात नेऊन तिची कथितरित्या बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी केल्याचा आरोप आहे. 19 मे रोजी गर्भातील बाळ मुलगी असल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठी महिलेवर दबाव टाकण्यात आला.
विद्यार्थी आंदोलनातील पोलिसी कारवाईवरून राहुल गांधी आक्रमक; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या
महिलेच्या वडिलांनी यास विरोध केल्यानंतर त्यांच्यावरही दबाव आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर 23 मे रोजी वाघोली येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये महिलेच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रार केल्यानंतर पुन्हा मारहाण
गर्भपातानंतर महिलेने पतीविरोधात पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर धनाजी टोणे यांना समज देण्यात आली होती. मात्र, तक्रार केल्याचा राग मनात धरून त्यांनी पुन्हा पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे. याच वेळी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचेही महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
धक्कादायक! डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू, काय घडलं?
सततच्या छळामुळे महिलेची प्रकृती बिघडली आणि ती माहेरी गेली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने तिने हडपसर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हे प्रकरण मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून पोलीस निरीक्षक इरफान नदाफ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, आपल्याविरोधात कारवाई होण्याची शक्यता लक्षात येताच धनाजी टोणे यांनी सुट्टी घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून त्यांच्या शोधासह प्रकरणातील आरोपांची सखोल चौकशी सुरू आहे.
एकाच व्यक्तीच्या नावावर किती SIM? सरकारने मर्यादा ठरवली; नियम चुकला तर कनेक्शन बंद