पालघरमधील तरुणीवर सहा जणांकडून लैंगिक अत्याचार; तीघांना अटक

Palghar gang rape case 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, तीन आरोपींना काही तासांत अटक करण्यात आली.

Palghar gang rape case

19 Year Old Girl Allegedly Gang Raped in Palghar; 3 Arrested : पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात 19 वर्षीय तरुणीवर सहा जणांनी सामूहिकपणे लैंगिक अत्याचार (Palghar gang rape case) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मित्रासोबत दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेल्या तरुणीला जबरदस्तीने एका बंद डाक बंगल्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर तलासरी परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.

ब्रॅड पिटने दिले ‘हार्ट ऑफ द बीस्ट’च्या कथानकाचे संकेत; म्हणाला, ‘ही एक…

या प्रकरणी पीडित तरुणीने तलासरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत तीन आरोपींना काही तासांतच अटक केली असून, उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके काम करत आहेत.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून बाहेर फिरण्यासाठी गेली होती. खामगाव परिसरात त्यांच्या दुचाकी रस्त्यावरुन घसरली, दोघेही रस्त्यावर पडले. याचवेळी मागून दुचाकीवरून आलेल्या तीन व्यक्तींनी त्यांना पाहिले.

TET पेपर लीक प्रकरण; सोलापूरमध्ये पोलीस प्रशिक्षण संस्थेचा चालक अटकेत

तक्रारीनुसार, या तिघांनी तरुणीच्या मित्राला धमकावत तेथून निघून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांनी आणखी तीन जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यामुळे एकूण सहा जण तिथे जमा झाले. यानंतर आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले आणि खामगावजवळील एका बंद पडलेल्या डाक बंगल्यात नेले. तिथे तिच्यावर सहा जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने आपल्या तक्रारीत केला आहे.

पोलिसांकडून तातडीने कारवाई

घटनेची माहिती मिळताच तलासरी पोलिसांनी तक्रारीची नोंद करून तपास सुरू केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने हालचाली केल्या. त्यानंतर तीन संशयित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 70(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

तीन आरोपी फरार, शोधमोहीम सुरू

प्रकरणातील आणखी तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या संभाव्य ठिकाणांची माहिती गोळा करून पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तपास पथकांकडून विविध दिशेने चौकशी सुरू आहे.

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेल अटकेत; लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप

दरम्यान, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, फरार आरोपींच्या अटकेनंतर या घटनेबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तलासरीचे पोलीस निरीक्षक अजय गरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू असून तपासाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे.

follow us