TET पेपर लीक प्रकरण; सोलापूरमध्ये पोलीस प्रशिक्षण संस्थेचा चालक अटकेत

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सोलापूर येथील खासगी

Maharashtra TET Paper Leak

Maharashtra TET Paper Leak : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सोलापूर येथील खासगी पोलीस प्रशिक्षक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन चालवणाऱ्या प्रकाश पवार याला अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी कारवाई करत प्रकाश पवारला अटक केली आहे. प्रकाश पवार याला अटक केल्यानंतर या प्रकरणात आता एकूण आरोपींची संख्या 16  वर पोहोचली आहे.

माहितीनुसार, सोलापुरातील कुमठे गावात प्रकाश पवार (Prakash Pawar) हा ध्रुव प्रतिष्ठान या नावाने खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. टीईटी पेपरफुटी प्रकरणात (Maharashtra TET Paper Leak) अटक करण्यात आलेल्या एका आरोपीच्या संपर्कात प्रकाश पवार होता तसेच काही विद्यार्थांची कागदपत्रे त्याने मुख्य आरोपींना दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याने भिवंडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणात त्याचा संबंध काय? आणि विद्यार्थ्यांची कागदपत्रे त्याने आरोपींना का दिली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरु आहे.

… तर शिंदेंना ‘मुख्य नेता’ पद दिलं कुणी? कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात प्रश्न

टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी बिहारमधून मुख्य आरोपी विजेंद्र गुप्ता याला देखील अटक केली आहे. भिवंडी पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात दिल्ली, आग्रा आणि बिहारमधून काही आरोपींना अटक केली होती.

कृषि विभागात नवीन पदे भरणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 मोठे निर्णय-

follow us