मोठी बातमी ! ‘वंदे मातरम्’चा अपमान आता गुन्हा ठरणार; राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून विधेयकाला मंजुरी

Vande Mataram: या कायद्यानुसार ‘वंदे मातरम्’ला सध्या राष्ट्रगीताला मिळत असलेलेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Dropadi Murmu

नवी दिल्ली: ‘वंदे मातरम्’चा गायनात जाणीवपूर्वक अडथळा आणणे किंवा ते थांबवणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयकाला ( Prevention of Insults to National Honour Act ) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कायदा तयार झाला आहे. (president murmu gives assent to bill criminalising-insult to vande mataram)

या कायद्यानुसार ‘वंदे मातरम्’ला सध्या राष्ट्रगीताला मिळत असलेलेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनातून ही माहिती देण्यात आली आहे. लोकसभेने 30 जुलै 2026 रोजी हे विधेयक मंजूर केले होते. तर राज्यसभेने त्याला त्याच्या आदल्या दिवशीच मंजुरी दिली होती. या कायद्यानुसार ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात प्रथमच लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून ‘वंदे मातरम्’चे गायन केले जाणार आहे.

यापूर्वी राष्ट्रीय गौरव अपमान प्रतिबंधक कायद्यानुसार राष्ट्रगीत ‘जन गण मन’चे गायन जाणीवपूर्वक थांबवणे किंवा राष्ट्रगीत गायनात सहभागी असलेल्या सभेत जाणीवपूर्वक व्यत्यय आणणे प्रतिबंधित होते.

या गुन्ह्यांसाठी तीन वर्षांपर्यंतची शिक्षा, दंड किंवा दोन्ही अशी तरतूद होती. तसेच त्यानंतरच्या प्रत्येक दोषसिद्धीसाठी किमान एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद होती. मात्र, जुन्या कायद्यात राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ला अशा प्रकारचे कायदेशीर संरक्षण मिळालेले नव्हते. आता वंदे मातरम ही या कायद्यात आले आहे.

follow us