Download App

Satish Kaushik Birth Anniversary : सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट

  • Written By: Last Updated:

Satish Kaushik Birth Anniversary : लोकप्रिय अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे खास मित्र अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक त्यांचा जुना व्हिडीओ शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Madhur Bhandarkar & Milind Shinde | Celebrity Gappa | LetsUpp Marathi

सतीश कौशिक यांच्या जयंतीनिमित्त अनुपम खेर यांनी भावनिक पोस्ट टाकली आहे. त्यांनी सांगितले आहे की,”माझा जिवलग मित्र सतीश कौशिक. वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा. आज तू ६७ वा वाढदिवस साजरा करू शकला असता. पण तुझ्या आयुष्यात ४८ वाढदिवस साजरे करण्याची संधी मला मिळाली होती. यामुळे आज संध्याकाळी मी तुझा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे ठरवले आहे.


अनुपम खेर यांनी पुढे असे देखील लिहिले आहे की,’शशी आणि वंशिकाच्या मधली खूर्ची मात्र रिकामी असणार आहे. माझ्या सर्व मित्र- मंडळींना विनंती करतो की, सतीशच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी नक्की या. अनुपम खेर यांच्या या भावनिक पोस्टवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत सतीश कौशिक, अनुपम खेर आणि अनिल कपूर दिसून येत आहेत. हे तिघेही एकमेकांचे चांगले खास मित्र होते. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमीदेखील अनुपम खेर यांनी दिली होती. अनुपम खेर यांनी ट्वीट देखील केलं होतं,”मृत्यू हे या जगाचे अंतिम सत्य मानलं जात’ हे माहित आहे. पण मी माझ्या जिवलग मित्र सतीश कौशिकविषयी असे लिहावे लागेल आहे, हे स्वप्नातही वाटले नव्हते. ४५ वर्षांच्या या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती”. अशी पोस्ट त्यांनी लिहली होती.

Tags

follow us