Download App

Sayali Sanjeev: ठरलं! नाशिकची भावी आमदार, खासदार होण्यास सायली संजीव तयार?

Sayali Sanjeev: मराठी सिरीयल, सिनेमांमध्ये उत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठी सिनेमामध्ये तिने साकारलेल्या सर्वच भूमिका उल्लेखनीय आहे. कलाक्षेत्रासोबतच सायलीला राजकीय (politics ) क्षेत्राची देखील आवड आहे. तिची गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण (MNS Party) चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

आता सायलीने राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याविषयी सांगितले आहे. एका दिलेल्या मुलाखतीत सायलीला राजकीय टिपणी (Political Commentary) केल्यावर तुला नेहमी ट्रोल केले जात आहे. याकडे तू कशी बघते? असा सवाल करण्यात आला होता. यावर सायली म्हणाली, आता मी एका पक्षामध्ये आहे. त्या पक्षाच्या मी पदावर आहे. तर अर्थात त्या पक्षाची बाजू मी मांडणार आहे. मी ज्या पक्षात आहे, त्या पक्षाची बाजू मांडताना जर माझ्यावर टीका होत असेल तर ते मी स्वीकारते.

राजकारणात टीका स्वीकारणे महत्वाचे आहे. संबंधित पक्षाची विचारधारा पुढे नेण्याकरिता तुम्हाला विचार मांडावे लागणार आहेत. यामुळे टीका होत असली तरी त्याचा मला फारसा फरक पडणार नाही. मी त्या पक्षात आहे तर मी त्या पक्षाचीच बाजू मांडणार आहे. दुसऱ्या पक्षाचे एखादे काम आवडले तर ते देखील मी सांगणार आहे. पण बाजू मांडत असताना मी माझ्या पक्षाची बाजू मांडणार हे इतकं साधं गणित असलयाचे यावेळी तिने सांगितले.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

जे राज्यासाठी, देशासाठी चांगले आहे, त्यांना चांगलं म्हणण्याची देखील आपल्याकडे वृत्ती असावी. पण त्यावर देखील टीका होते त्याकरिता धन्यवाद. कारण टीका करणारे एवढा वेळ माझ्यासाठी देत आहेत, माझ्याविषयी बोलत आहेत याचा मला खूप आनंद असल्याचे सांगितले. भविष्यामध्ये नाशिकचा नगरसेवक, आमदार, खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का? असाही सवाल सायलीला करण्यात आला.


यावर ती म्हणाली, मला तर माहीत नाही. असेलही. कारण नक्कीच मला काम करायला आवडणार आहे. सायली ज्या पक्षामध्ये आहे, त्या पक्षासोबत तिला यापुढे नगरसेवक, आमदार, खासदार या पदासाठी काम करायची इच्छा असल्याची दिसून येत आहे.

Tags

follow us