The Vaccine War : चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) हे सिनेविश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपट सत्य घटनेवर आधारित बनवले आहेत. 2022 मध्ये आलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले होते. यानंतर ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) चित्रपटातून कोरोना काळात अल्पावधीत स्वदेशी कोरोनाची लस बनवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांची धडपड दाखवण्यात आली होती.
उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्यापूर्वी आज भाजपच्या खासदारांसाठी संसद भवनात ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपट दाखवण्यात येणार आहे. ही बातमी सोशल मीडियावर शेअर करताना विवेक अग्निहोत्री यांनी आनंद व्यक्त केला. व्हिडिओ क्लिप शेअर करताना विवेक अग्निहोत्री यांनी X (ट्विटर) वर लिहिले, “व्वा! आज पहाटे ही खूप चांगली बातमी मिळाली. सर्व शास्त्रज्ञांसाठी मी खूप आनंदी आहे.”
विवेक अग्निहोत्रीचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट गेल्या वर्षी 28 सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. मात्र ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
सत्ताधारी आमदारांवर महापालिका मेहरबान; मुंबईकरांचा पैसा सरकारच्या बापाचा का? काँग्रेसचा संतप्त सवाल
काही दिवसांपूर्वी विवेक अग्निहोत्री यांनी बेंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या पुढील चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट महाभारताच्या कथेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘पर्व’ आहे. या चित्रपटाचे लेखन प्रसिद्ध लेखक एस.एल. भैरप्पा यांनी लिहिलेल्या ‘पर्व’ या प्रतिष्ठित कादंबरीवर आधारित आहे. हा चित्रपट तीन भागांत प्रदर्शित होणार आहे. यासोबतच विवेक अग्निहोत्री ‘द दिल्ली फाइल्स’मध्येही काम करत आहेत.
धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? श्याम मानव यांचा गंभीर आरोप