धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? श्याम मानव यांचा गंभीर आरोप

धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? श्याम मानव यांचा गंभीर आरोप

Shyam Manav On Devendra Fadnavis : राज्यातील शिंदे(Eknath shinde ), फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजितदादांच्या (ajit pawar )नेतृत्वाखालील सरकार उच्चभ्रू आणि ब्राम्हण जातीच्या बाबांवर कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव (Shyam Manav)यांनी केला आहे. कायदा सर्वांसाठी एकच आहे पण तसं होताना दिसत नसल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले. धीरेंद्रकृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri
)हे जातीनं ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? असा थेट सवाल यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी उपस्थित केला आहे.

शिंदेंनी इशारा करायचा अन् चहल यांनी नाचायच… ठाकरेंचा वाघ मुख्यमंत्री अन् BCM आयुक्तांवर भडकला

श्याम मानव यांनी म्हटलंय की, 2005 साली जादूटोणा विरोधी कायदा तयार होत असताना एक सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. त्यांनी मला चिडून असं सांगितलं की, कायद्याचं जे प्रारुप तुम्ही तयार करत आहेत त्यानं काय होणार आहे? 2005 मध्ये कायदा संमत करण्यात आला.

काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वाने पत्र द्यावे, तोपर्यंत वंचित ‘मविआचा’ भाग होणार नाही : आंबेडकरांचा तोरा कायम

त्यावेळी मला ते म्हणाले की, या कायद्यानुसार तुम्ही आमच्या आदिवासी बांधवांवर, गरीब आणि दलितांवर कारवाई कराल, मात्र उच्चभ्रू बाबा, ब्राह्मण असलेल्या बाबांवर कारवाई तुम्ही करु शकणार नाही. पोलीस काय किंवा सरकार काय? कुणीही कारवाई करणार नाही असं मला ते म्हणाले होते.

मी त्यांना सांगितलं कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे असं होणार नाही. उच्चभ्रू असोत किंवा वरच्या जातीमध्ये जन्माला आलेले अस किंवा खालच्या जातीत जन्माला आलेले, त्याने काहीही फरक पडणार नाही. असं आपण त्या मंत्र्यांना समजावलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube