शिंदेंनी इशारा करायचा अन् चहल यांनी नाचायच… ठाकरेंचा वाघ मुख्यमंत्री अन् BCM आयुक्तांवर भडकला

शिंदेंनी इशारा करायचा अन् चहल यांनी नाचायच… ठाकरेंचा वाघ मुख्यमंत्री अन् BCM आयुक्तांवर भडकला

मुंबई : महापालिकेकडून विरोधी पक्षातील आमदारांना एकही न रुपया मिळाल्याचा मुद्दा चांगलाच तापला आहे. “यात महानगरपालिकेची त्यात काही चूक नाही. आयुक्तांना अधिकार ठेवले नाहीत. ते बाहुले झाले आहेत. नगरविकास खात्याने इशारे करायचे आणि आयुक्तांनी नाचायचे सुरु आहे, असा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अजय चौधरी (Ajay Choudhari) यांनी या प्रकरणावरुन थेट मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महापालिका आयुक्त, प्रशासक इक्बालसिंह चहल यांना लक्ष्य केले आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) faction MLA Ajay Chaudhary criticized Chief Minister, Eknath Shinde and BMC Commissioner, Iqbal Singh Chahal.)

सत्ताधारी आमदार आणि विरोधी आमदारांना मिळणाऱ्या निधीची मुद्दा महाराष्ट्रात कायमच चर्चेचा असतो. सत्ताधारी आमदारांना भरघोस निधी मिळतो, मात्र विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळत नाही असा आरोप केला जातो. अशात मुंबई महापालिकेकडून (BMC) मुंबईतील सर्वपक्षीय 36 आमदारांपैकी शिवसेना-भाजपच्या 21 आमदारांना कोट्यावधींचा निधी तर विरोधी पक्षातील 15 आमदारांना एकही रुपयांचा निधी मिळाला नसल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. आमदार अजय चौधरी यांनीही या वृत्ताला दुजोरा देत शिंदे आणि चहल यांच्यावर आरोप केले आहेत.

काय म्हणाले अजय चौधरी :

प्रभागातील विकास कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे आयुक्तांनी पत्र दिले होते. पालकमंत्र्यांची शिफारस आवश्यक होती, म्हणून आम्ही त्यांनाही पत्र लिहिले होते. पण पालकमंत्री देखील काहीही करत नाहीत. ते सुद्धा इशाऱ्यांवर चालत आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांना भेटलो. त्यावर दादांनी उत्तर दिले की, चौधरी साहेब मुख्यमंत्री साहेबांचे आदेश आहेत की, ठाकरेंच्या एकाही आमदाराला एकही रुपयांचा निधी द्यायचा नाही. हे काय सरकार आहे का? असा आरोप करत चौधरी यांनी संताप व्यक्त केला.

नेमके प्रकरण काय?

मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत महाराष्ट्र विधानसभेचे 36 आमदार आहेत, त्यापैकी 15 भाजपचे (BJP), सहा शिवसेना (ShivSena), नऊ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), चार काँग्रेसचे (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि समाजवादी पक्ष यांचे प्रत्येक एक-एक आमदार आहेत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 2023-24 च्या खर्चासाठी 36 पैकी 32 आमदारांनी निधीची मागणी केली होती. यातील सत्ताधारी 21 आणि विरोधी पक्षातील 11 आमदारांचा समावेश होता. पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबालसिंह चहल यांनीही स्वतः याबाबत माहिती दिली होती.

BMC मध्ये मोठा खेळ! भाजप-शिवसेनेला कोट्यावधींचा निधी, ‘मविआ’च्या आमदारांना ‘शून्य’ रुपये

यानंतर 52,619 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पातील सुमारे अडीच टक्के म्हणजे 1,260 कोटी रुपयांची लोकप्रतिनिधींसाठी तरतूद केली होती. प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त 35 कोटी रुपयांची मागणी करण्याचा अधिकार होता. यानंतर 16 फेब्रुवारी रोजी “आमदार/खासदारांकडून त्यांच्या मतदारसंघात विविध विकासकामे, पायाभूत सुविधांची कामे, सुशोभीकरण कामे इत्यादीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे पत्रे मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली आहेत, असे नमूद करत 16 फेब्रुवारी 2023 रोजी चहल यांनी या खर्चाला मान्यता दिली होती.

आम्ही राजकारण सोडू, तुम्ही राज्यसभा सोडणार? आदित्य ठाकरेंच्या जुन्या मित्रांचे राऊतांना आव्हान

मात्र, फेब्रुवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या 10 महिन्यांत महापालिका आयुक्त आणि प्रशासक चहल यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या 21 आमदारांना 500.58 कोटी रुपयांचे वाटप केले, तर विरोधी पक्षातील 11 आमदारांना काहीही मिळाले नसल्याचा आरोप आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार आणि गटनेते अजय चौधरी यांनीही या आरोपाला दुजोरा दिला आहे. महानगरपालिकेची त्यात काही चूक नाही. आयुक्तांना अधिकार ठेवले नाहीत. ते बाहुले झाले आहेत. नगरविकास खात्याने इशारे करायचे आणि आयुक्तांनी नाचायचे, असा आरोपही त्यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज