आम्ही राजकारण सोडू, तुम्ही राज्यसभा सोडणार? आदित्य ठाकरेंच्या जुन्या मित्रांचे राऊतांना आव्हान
Rahul Kanal : ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी खिचडी घोटाळ्याप्रकरणी आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचे दोन जुने मित्र जे आज शिंदे गटामध्ये गेले आहेत. त्या राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना उत्तर दिले आहेत. तसेच त्यांनी राऊत आणि ठाकरे गटाला आव्हान दिले आहे.
यावेळी बोलताना घोले आणि कनाल म्हणाले की, खिचडी घोटाळा असो की इतर काही प्रकरणं यामध्ये या सर्व लोकांची ऑन रेकॉर्ड नाव आलेली आहेत. मात्र यामध्ये आमच्या दोघांची कुठेही नावं नाहीत. आमची नावं आढळल्यास आम्ही राजकारणाचा त्याग करू. उलट यामध्ये संजय राऊत आणि त्यांच्या लोकांचीच नावं या कोरोना काळातील अनेक घोटाळ्यांमध्ये आलेले आहेत. आता त्यांच्याकडून केवळ पक्ष सोडणाऱ्या लोकांवरती चोर किंवा खोके सरकार अशा आरोप केले जातात. असं अमेय घोले म्हणाले.
Lok Sabha 2024 : सोनिया गांधी तेलंगाणातून लोकसभा लढणार? CM रेड्डींनी काय सांगितलं
तर राहुल कनाल यांनी सांगितलं की, माझं नाव कोणत्याही घोटाळ्यात आलं. तर कायदेशीर प्रक्रिया असो किंवा राजकारण सोडायला देखील मी तयार आहे. मात्र राऊत अशाप्रकारे मीडियासमोर येऊन या सर्व प्रकरणांबाबत स्पष्टीकरण देऊ शकतील का? असा सवाल कनाल यांनी उपस्थित केला. आमच्या पत्रकार परिषदेनंतर जर तुम्ही पत्रकार परिषद घेणार असाल तर माझं तुम्हाला आव्हान आहे की, आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ तुम्ही तुमच्या सत्य दाखवा आणि आमचे दाखवा. तसेच यावेळी राहुल कानाल यांनी त्यांनी केलेल्या कामांचे पुरावे आणि त्यावर ठाकरे आणि संजय राऊत यांनी त्यांच्या केलेल्या कौतुकांचे फोटो आणि व्हिडिओ देखील यावेळी दाखवले. त्यामुळे खिचडी घोटाळ्याबद्दल केलेले आरोप खोटे निघाले तर संजय राऊत राजीनामा देणार का? असंही कनाल यांनी विचारलं.
Video : राम मंदिराचा उल्लेख, जोरदार टाळ्यांचा कडकडाट अन् मूर्मूंना घ्यावा लागला भाषणात भलामोठ्ठा पॉज
तर यावेळी अमेय खोले यांनी आरोप केला की, संजय राऊत यांचे दौरे सांभाळणारे सुनील कदम सुजित पाटकर यांच्या अकाउंटवर पैसा येत होता. याचा पुरावा म्हणून महापौर बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज बघा. कोरोना काळामध्ये ते महापौर बंगल्यावर ते का यायचे तसेच कितीतरी अधिकाऱ्यांना त्यांचे फोन का जायचे? हिल टॉप येथील फुटेज पाहा तिकडे काय चालायचे? तुम्ही आधी घरात पहा आणि मग बोला. हिल टॉप हॉटेलमध्ये कुठल्या कारकुनाने 80 ते 90 कोटींचा फंड साफ केला. यांची चौकशी झाली पाहिजे. या सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे.
तर राहुल कनाल यांनी सांगितलं की, माझं काम चांगलं नाही, मग तेव्हा तुम्ही माझ्या कामाची शाबासकी का दिली? मग तुम्ही माझं पोस्टर का लावले? तेव्हा राहुल कणाल चांगला होता. आम्ही 1 लाख रेशन किट वाटले तेव्हा आम्ही कोणाकडून पैसा नाही मागितलं. तुमचे नेते तेव्हा बोले राहुलने दिवस रात्र काम केले. आम्ही रात्रभर औषधे पुरवली तुम्ही कधी डेड बॉडीला हात लावला का?
संजय राऊत काय म्हणाले होते?
खिचडी घोटाळे प्रकरणी आरोप केल्यानंतर संजय राऊतांनी राहुल कनाल यांना इशारा दिला होता की, सर्व चोर कंपन्यांचे वस्त्रहरण करेन. हे सर्वजण लुटीचा पैसा घेऊन पळालेली माणस आहेत. तसेच खिचडीच्या संदर्भातील काम मिळालेल्या कंपन्यांची यादी जाहीर करा. त्यातील कित्येक लोक आज शिंदे गटात आहेत. जे पत्रकार परिषद घेणार आहे त्या सर्वांना उघडं करेन त्यांनी दिला आहे.