मुंबई : बाजार नियामक सेबी (SEBI)ने बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या पत्नी आणि मेहुण्यावर कारवाई केली आहे. यूट्युबवर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई केली आहे. सेबीने अर्शद सह 45 यूट्युबर्संना शेअर पंप अॅंड डंप योजनेमध्ये (Share Pump & Dump scheme) दोषी घोषित केले. या लोकांवर गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणे आणि शेअर बाजाराला नुकसान पोहचवण्याचा आरोप लावला आहे. त्यामुळे तुम्ही देखील असा प्रकारे यूट्युबनर शेअर बाजार (Share Market) आणि स्टॉक संबंधित माहिती घेत असाल तर सावधान रहा.
सेबीने त्यांच्या आदेशात म्हटले की, अर्शद वारसी आणि त्याची पत्नीही यूट्युब चॅनलमधून शेअर पंप अॅंड डंप ही योजना चालवत होते . मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्सबद्दल चुकीची माहिती देत. गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करत होते. लोकांना आकर्षित करण्यासाठी चॅनलवर पैसे देऊन जाहिराती चालवत होते. नुकतचं त्यांनी टिव्ही चॅनल साधना ब्रॉडकॉस्टसंदर्भात गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक केली आणि त्यांच्या शेअर्सकी किंमत वाढवली. नेट प्रॉफिटपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी शेअर विकून फायदा घेतला. सेबीचे म्हणणे आहे की असे यूट्युबर्स केवळ पंप आणि डंपद्वारे एका महिन्यात 75 लाख रुपयांपर्यंत कमाई करत होते. सेबीने त्यांच्या पत्नीशी यासंबंधीचे संभाषणही रेकॉर्ड केले आहे.
Ghar Banduk Biryani : दिमाखदार म्युझिक लाँचमध्ये ‘आहा हेरो’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
सेबीकडून गेल्या अनेक दिवसांपासून यूट्युब इंफ्लूएंसर्सवर कारवाई करण्याच्या तयारीत होती. याप्रकरणी दोन वर्षांपूर्वी नियम बनविण्याचे काम सुरू झाली होती. SEBI ने म्हटले की, या प्रकरणात दोषी आढळलेल्या अर्शद वारसीसह अनेक यूट्युबर्स गुंतवणूकदारांची दिशाभूल करत होते आणि महिन्याला 75 लाख रुपये कमवत होते. सर्व दोषींवर कारवाई करत सेबीने ताबडतोब बाजारातील व्यापारावर बंदी घातली आहे. या प्रकरणात अर्शद वारसी आणि त्याच्या पत्नीवरही बंदी घालण्यात आली आहे. सेबीने मारिया गोरेटीला मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासही बंदी घातली आहे.
ताज्या प्रकरणात सेबीने अनेक यूट्यूब चॅनेलवरही बंदी घातली आहे. यामध्ये मनीवाइज, द अॅडव्हायझर, मिडकॅप कॉल्स आणि प्रॉफिट यात्रा सारख्या यूट्युब चॅनेलचा समावेश आहे. सेबीचे म्हणणे आहे की हे चॅनेल त्यांचे काम झाल्यानंतर हटवले जातं.