Download App

Bad Boy : मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज !

मुंबई : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याचा बॅड बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘आलम ना पुछो’ असं या गाण्याचं नाव आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत.

या अगोदर होळीच्या दिवशी या चित्रपटचा टीझर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांनी या टीझरला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानंतर या चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झाले होते. तेरा हुआ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं प्रसिद्ध गायक अरजित सिंगने गाणं गायलं आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

हैद्राबादमध्ये या गाण्याचा लॉंच सोहळा पार पडला. ‘आलम ना पुछो’ हे गाणं प्रसिद्ध गायक पायल देव, राज बर्मन आणि आक्रिती मेहरा यांनी गायल आहे. हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलं आहे. तर शाबीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे.

या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन ज्येष्ठ दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केलं आहे. चित्रपटाचं प्रोडक्शन अंजुम कुरेशी आणि साजित कुरेशा यांनी इनबॉक्स पिक्चर्स या बॅनरखाली केले आहे.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jan सलमानच्या नव्या गाण्याने वेधले लक्ष

याचित्रपटातील कलाकारांची नावं सांगायची झाली तर नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. जॉनी लिव्हर, राजपाल यादव, दर्शन जरीवाला, शाश्वत चॅटर्जी यांचा सहभाग आहे. 28 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Tags

follow us