Download App

Seema Deo passed away : सुखी संसाराचं रहस्य सांगत सीमा यांनी सिनेसृष्टीतील दाम्पत्यांना दिला होता कानमंत्र

Seema Deo passed away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव ( Seema Deo passed away) यांचे निधन झाले. आज (24 ऑगस्ट) रोजी वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्या 81 व्या वर्षांच्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्या अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सीमा देव आणि त्यांचे पती रमेश देव या जोडीने खऱ्या आयुष्यासह पडद्यावर देखील सुखी संसार केला. रमेश देव यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन गेल्या वर्षी झालं. तर सीमा यांनी देखील त्यांच्यानंतर लगेचच अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक वर्ष सुखी संसार केला. त्यांच्या या सुखी संसाराचं रहस्य (happy married life mantra) त्यांनी त्यांच्या लग्नाच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना सांगितलं होतं.

‘मनु’ आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला, लई वाईट वाटलं असल…; अमोल मिटकरींची भिडेंवर टीका

देव दाम्पत्याच्या सुखी संसाराचं रहस्य…

2013 मध्ये रमेश आणि सीमा देव (Seema Deo) यांनी आपल्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी सीमा यांनी आपल्या दोघांच्या आयुष्याविषयी काही गोष्टी शेअर केल्या होत्या. तेव्हा त्यांच्याशी त्यांच्या सुखी संसाराचं रहस्य काय? असं विचारण्यात आलं होतं. त्यावर त्यांनी आपल्या सुखी सहजीवनाचं रहस्य (happy married life mantra) सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, लग्नाची हा 50 वर्ष कशी गेली हे कळालंच नाही.

National Film Awards: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज होणार घोषणा

पुढे सीमा देव (Seema Deo passed away) म्हणाल्या की, ठरवून कोणत्याही गोष्टी केल्या नाही. मात्र दोघंही सारख्याच क्षेत्रातील असल्याने कोणत्या अडचणी येतील. त्याला कसं तोंड द्यायचं? याचा आधीच विचार करून ठेवला होता. आम्ही दोघंही वेगेवेगळ्या ठिकाणी शूटींगला जात होतो. वेगवेगळ्या अभिनेते-अभिनेत्रींसोबत काम केले. रोमॅंटीक सीनही केले. मात्र ते पडद्यावरचे आहेत. ते खरे नाहीत. हे कायम समजून घ्यायचो. हे आमचा एकमेकांवर विश्वास होता. म्हणून होऊ शकलं. त्यामुळे सुखी संसारासाठी एकमेकांवर विश्वास असणं गरजेचं आहे. असं म्हणत त्यांनी आपल्या सुखी संसाराचं रहस्य सांगितलं होतं.

अशी सुरु झाली सीमा देव यांची लव्हस्टोरी…

सीमा देव (Seema Deo) या मराठी आणि हिंदी मनिराजंसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० हून जास्त सिनेमात काम केले आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी हिंदी सिनेमात काम करणे बंद करून केवळ मराठी सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. त्या दोघांची पहिली भेट देखील खूपच रंजक होती. सीमा सिनेमामध्ये काम मिळावे, म्हणून फिल्मीस्थानमध्ये ऑडिशन देण्यासाठी त्यांच्या आईबरोबर चर्नी रोडवरून लोकलमधून आल्या होत्या.

Seema Deo Passed Away

त्यावेळी सीमा फक्त १५ वर्षांच्या होत्या. त्या त्यांच्या आईची साडी घालून आणि डोक्यामध्ये मोगर्‍याचा गजरा माळून ऑडिशनसाठी आल्या होत्या. तर दुसरीकडे ग्रँटरोडवर रमेश देव त्याच लोकलमध्ये होते. त्यावेळी ‘आंधळा मागतो एक डोळा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला असल्याने रमेश देव यांना लोकांनी ओळखण्यास सुरुवात केली होती. या सिनेमात रमेश यांची खलनायकाची भूमिका साकारली होती.

सीमा यांनी त्यांना पाहताक्षणी ओळखले आणि त्यांच्या आईला सांगितले होते. हेच ‘आंधळा मागतो एक डोळा’ सिनेमामधील दुष्ट खलनायक आहेत. यावर त्यांच्या आईने त्यांना रागावून ‘त्यांच्याकडे बघू नको’ असे सांगितले होते. तसेच सीमा यांनी लावलेल्या मोगर्‍याच्या गाजऱ्याचा संपूर्ण डब्यात सुगंध पसरला होता. रमेश आणि सीमा देव यांची हीच पहिली भेट होती. पहिल्या भेटीत रमेश सीमा यांच्या प्रेमात पडले होते. ‘सुंदर मुलगी आहे, आता हिला पाटवायचे, असेच त्या वेळी माझ्या मनात आल्याचे’ रमेश देव प्रांजळपणे कबूल केल्याचे बघायला मिळाले होते.

https://www.instagram.com/ajinkkyadeo/

रियल-लाइफ कपलने तब्बल ७३ सिनेमामध्ये नवरा-बायकोची भूमिका साकारली आहे. या दोघांचे अनेक सिनेमा पडद्यावर आले आणि चाहत्यांना दोघांची जोडी खूप आवडली. या काळात दोघांनी १९६२ मध्ये ‘वरदक्षिणा’ हा सिनेमा देखील केला होता. सिनेमाच्या कथानकानुसार, सीमा यांना दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करत असल्याचे बघायला मिळाले होते. रमेश यांचे पात्र प्रेमात पडते. हा तोच सिनेमा होता, ज्यातून दोघांना एकमेकांबद्दलचे प्रेम वाटू लागले आणि त्याच वर्षी दोघांनी देखील नात्याचा विलंब न लावता लग्न केल्याचे बघायला मिळाले होते.

Tags

follow us