Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

Kriti Senon Kiss: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमामुळे सध्या बॉलिवूड अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या खूपच चर्चेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, आणि तो प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. VFX मुळे सुरुवातीला ट्रोल झालेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला आता मात्र चाहत्यांची मोठी पसंती दर्शवली जात आहे. परंतु आता क्रिती सेनन चांगल्याच […]

Kriti Senon

Kriti Senon

Kriti Senon Kiss: ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमामुळे सध्या बॉलिवूड अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) सध्या खूपच चर्चेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे, आणि तो प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडला आहे. VFX मुळे सुरुवातीला ट्रोल झालेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला आता मात्र चाहत्यांची मोठी पसंती दर्शवली जात आहे. परंतु आता क्रिती सेनन चांगल्याच वादात सापडली आहे.

मंदिराबाहेर तिने केलेला एक किस यासाठी कारणीभूत ठरला जात आहे. यानंतर यावरुन दोन गट पडले असून सोशल मीडियावर या प्रकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 7 जून रोजी क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरामध्ये दर्शनासाठी गेली होती. यावेळी मंदिराच्या बाहेर निरोप घेत असताना दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) याने क्रिती सेननला गालावर किस केल्याने हा वाद पेटला आहे.

यानंतर तेलंगणाच्या चिलकूर बालाजी मंदिराच्या (Chilkur Balaji Temple) मुख्य पुजारींनी त्यांच्यावर टीका केली आहे, हॉटेल रुम बूक करा असा सल्ला पुजाऱ्याने यावेळी दिला आहे. ही एक निषेधार्ह कृती आहे. नवरा आणि बायकोही मंदिरात एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेल रुममध्ये जाऊन हे करु शकता. तुमचं वागणं हे रामायण आणि देवी सीतेचं अपमान करणारे आहे, असं ते यावेळी म्हणाले आहेत. ओम राऊत आणि क्रिती सेननचा किस करतानाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


भाजपाचे राज्य सचिव रमेश नायडू यांनी देखील यावरुन जोरदार टीका केली होती. मात्र नंतर त्यांनी आपलं हे ट्वीट डिलीट केले आहे. मंदिरासारख्या पवित्र परिसरात त्यांनी प्रसिद्धीचे हे फंडे टाळले पाहिजेत असं ते यावेळी म्हणाले आहेत. 6 जून रोजी तिरुमला येथे ‘आदिपुरुष’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यासाठी ‘आदिपुरुष’ सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती. दरम्यान बुधवारी ओम राऊत आणि क्रिती सेनन तिरुपतीमधील वेंकटेश्वरा मंदिरात दर्शनासाठी आले होते. व्हायरल व्हिडीओमध्ये ओम राऊत मंदिराबाहेर क्रिती सेननचा निरोप घेत असताना गालावर किस करताना दिसत आहे.

https://letsupp.com/entertainment/urfi-javed-sexy-video-urfi-javed-showed-sexy-figure-in-sizzling-bikini-video-viral-55029.html

मंदिराच्या आवारात अशाप्रकारे किस केल्याने अनेकांना हे आवडले नाही. एकीकडे किसवरुन वाद सुरु असताना क्रिती सेननने इंस्टाग्रामला पोस्ट शेअर केली आहे. तिरुपती मंदिर भेटीच्या दरम्यान मिळालेलं प्रेम आणि आपुलकीबद्दल तिने आभार मानले आहेत. चाहत्यांचे आभार मानत असताना क्रितीने आपलं मन सकारात्मकतेने भरलं असल्याचे सांगितले आहे. ‘आभार’ माझं मन सकारात्मकतेने भरलं आहे. तिरुपतीमधील पवित्र आणि शक्तिशाली ऊर्जा, आणि काल रिलीजआधी झालेल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांना आदिपुरुष आणि जानकीला दिलेलं प्रेम…माझ्या चेहऱ्यावर अद्यापही हास्य आहे,” असं क्रिती सेननने पोस्टमध्ये सांगितले आहे.

दरम्यान मंदिराबाहेर आल्यावर ओम राऊतने प्रसारमाध्यमांशी बोलत असताना सांगितले होते की, मंदिरात आल्यावर मला फारच चांगलं वाटत आहे. आज सकाळी आमचं चांगलं दर्शन झाले आहे. काल आम्ही ट्रेलर रिलीज केला होता. हा एक मंत्रमुग्ध करणारी भावना असून शब्दात मांडू शकत नसल्याचे यावेळी तिने पोस्टमध्ये सांगितले आहे.

Exit mobile version