Senior and distinguished playwright, Gangaram Gavankar, passed away : ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटककार माननीय गंगाराम गव्हाणकर यांचे सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी रात्र 10 वाजून 40 मिनिटांनी दुर्दैवी निधन झाले. त्यांनी दहिसर पूर्व येथील एका खाजगीर रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्यानंतर तीन मुलं, सुना आणि नातवंडाचा परिवार आहे.
राज्यावर मोंथा चक्रीवादळाचं सावट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार धुव्वाधार पाऊस
त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाने एक श्रेष्ठ आणि सर्जनशील लेखक आणि कलाकार गमावला आहे. त्यांच्या नाटकांबद्दल सांगायचं झालं तर वेडी माणसं हे त्यांचं पहिला नाटक. त्यानंतर दोघी, वर भेटू नका, वरपरीक्षा यांसारखे अनेक नाटकं त्यांनी लिहिली. त्यांच्या लेखनात विनोद व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाप असायचा. त्यांच्या वात्रट मेले या नाटकाची तब्बल 2000 हून अधिक प्रयोग झाले. तर वन रूम किचन या नाटकाने हजारवर प्रयोगांवर याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केलं.
https://x.com/ShelarAshish/status/1982878031711744283?t=qZtyWQ3lOSTGg2mcXp71EQ&s=08
मोठी बातमी! ‘अल कायदा’शी संपर्कात असलेल्या तरुणास पुण्यात अटक
हे सर्वांमध्ये त्यांच्या सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे वस्त्रहरण या नाटकाने मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवली आणि मच्छिंद्र कांबळे यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंगळवारी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी B/401,पारिजात,परबत नगर, चांडक(निषचंय)जवळ, एस. व्ही. रोड,दहिसर (पूर्व), mumbai-400068 येथे नेण्यात येणार आहे. अंतिम संस्कार दहिसरच्या अंबावाडी, दौलत नगर स्मशानभूमी करण्यात येणार आहेत.
आमच्या मालवणी मुलूखातील एक प्रतिभावंत गमावला !
यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पोस्ट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, ते म्हणाले की, मालवणी बोलीभाषेतून लेखन करुन ज्यांनी कोकणातील माणसाचे भावविश्व, बोलीभाषेचा ठसकेबाज लहेजा जगाला परिचित करुन दिला असे ‘वस्त्रहरण’कार लेखक, नाटककार गंगाराम गवाणकर यांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याचे वृत्त कळले आणि खूप दु:ख झाले. माझा त्यांचा खूप जुना स्नेह होता. दोनच दिवसापूर्वी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती, त्यावेळी वाटले होते ते आजाराला पराभूत करुन पुन्हा नव्या दमाने उभे राहतील. पण दुर्दैव, आम्ही आमच्या मुलूखातील एक अस्सल मालवणी, ठसकेबाज आणि प्रतिभावान लेखक गमावला !
