Download App

Shah Rukh Khan; ओळख न देणारे हेमंत बिस्वा सरमा अखेर शाहरुखच्या प्रेमात

Shah Rukh Khan : आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी काही दिवसांपूर्वी ‘शाहरुख खान कौन हैं?’ असे विचारत पठाण चित्रपटाची खिल्ली उडवली होती. पण आसाम विधानसभेच्या नवीन इमारतीचे उदाघाटन करताना याच हेमंत बिस्वा सरमा यांनी शाहरुखच्या सुपरहिट ‘स्वदेस’ चित्रपटातील संगीत आपल्या ट्विटमध्ये वापरले आहे.

हेमंत बिस्वा सरमा यांनी आसामी संगीतकार किंवा आसामी चित्रपटातील संगीताऐवजी हिंदी चित्रपटातील संगीत वापरल्याने त्यांच्यावर टीका होते आहे. आसामचे मुख्यमंत्री “आसामी संस्कृती आणि संगीतकारांबद्दल उदासीन” असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

आसाम विधानसभेच्या नवीन इमारतीचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट केले की, “आसाम विधानसभेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचे काही संस्मरणीय क्षण.” या ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे, या ट्विटमध्ये शाहरुख खानच्या 2004 च्या ‘स्वदेस’ चित्रपटातील ‘ये जो देश है मेरा’ हे संगीत वापरले आहे.

हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे, समीर वानखेडेंचं दाऊदला ओपन चॅलेंज…

‘शाहरुख खान कोण आहे?’
जानेवारीमध्ये शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून वाद निर्माण झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी दीपिका पादुकोणने घातलेल्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. विश्व हिंदू परिषदेने तर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

देशाच्या इतर भागांप्रमाणे, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटीमध्ये एका थिएटरमध्ये विरोध करत हल्ला केला होता. यावरुन चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.

Shahrukh Khan च्या जवानच्या जिंदा बंदा गाण्याचं ‘शायर वसीम बरेलवींशी’ खास कनेक्शन, वाचा…

त्यावेळी ‘पठाण’च्या स्क्रीनिंगबद्दल विचारले असता हेमंत बिस्वा सरमा म्हणाले होते की, “शाहरुख खान कोण आहे? मला त्याच्याबद्दल किंवा त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाबद्दल काहीही माहिती नाही.”

Tags

follow us