हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे, समीर वानखेडेंचं दाऊदला ओपन चॅलेंज…
हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे, असं ओपन चॅलेंजच एनसीबीचे माजी संचालक आणि आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दिलं आहे. एका मुलाखतीदरम्यान समीर वानखेडेंना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी छातीठोकपणे भाष्य केलं आहे. समीर वानखेडे यांची एक डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर एकच चर्चा रंगली आहे.
पुढे बोलताना समीर वानखेडे म्हणाले, हे गुन्हेगार आमच्यासाठी खूपच लहान आहेत. आत्ता मी त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करणार नसून मला येत असलेल्या धमक्यांना मी अजितबातच घाबरत नाही. तसेच परदेशातून धमक्या देणाऱ्याला माझं ओपन चॅलेंज आहे, हिंमत असेल तर समोर येऊन धमकी दे, या शब्दांत वानखेडेंनी छातीठोकपणे प्रत्युत्तर दिलं आहे.
दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, संशोधनातून माहिती समोर
दरम्यान, झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाला सध्या चांगलीच पसंती मिळतेयं. या कार्यक्रमात अनेक दिग्गज राजकारणी, कलाकार हजेरी लावत असतात. त्यामुळे या कार्यक्रमात केलेल्या विधानांची चर्चा चांगलीच रंगत असते. नूकतीच समीर वानखेडेंनीही या कार्यक्रमात मुलाखत दिलीयं. त्यांच्या मुलाखतीचा प्रोमो समोर आला असून त्यामध्ये बिनधास्तपणे वानखेडे भाष्य करताहेत.
या कार्यक्रमात निवेदक अवधूत गुप्ते यांनी समीर वानखेडेंची मुलाखत घेतलीयं. ‘तुम्हाला दाऊद इब्राहिमकडून धमक्या येत आहेत’ असं अनेकदा ऐकायला मिळालंय, असा सवाल गुप्तेंकडून करण्यात आला होता. त्यावर वानखेडेंनी सडेतोडपणे उत्तर दिलं आहे.