दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, संशोधनातून माहिती समोर

दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, संशोधनातून माहिती समोर

2030 पर्यंत दरडोई उत्पन्नात गुजरात अव्वलस्थानी तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहणार असल्याचं समोर आलं आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या संशोधन अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. तसेच तामिळनाडू, कर्नाटक, हरियाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेशचाही क्रमांक राहणार असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या देशात दरडोई उत्पन्नात तेलंगणा राज्य अव्वलस्थानी आहे. त्यामुळे आगामी काळात गुजरातच्या दरडोई उत्पन्नात झपाट्याने वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच ‘कलम 353’ हटविणार? कर्मचारी संघटना आक्रमक

तसेच भारताच्या दरडोई उत्पन्नातही मोठी वाढ होणार असल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. पुढील वर्षात 7 ते 70 टक्क्यांवरुन 2450 ते 4000 डॉलरपर्यंत पोहचणार असल्याचीही शक्यता आहे. तसेच 2011 साली दरडोई उत्पन्न $460 वरून $1413 पर्यंत वाढले आहेत. त्यामुळे भारताला $6 ट्रिलियन जीडीपी आणि मध्यम-उत्पन्न अर्थव्यवस्था बनण्यास मदत होणार आहे.

तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी विदेशी व्यापार मोठ्या प्रमाणात हातभार लावणार असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे 2030 पर्यंत दरडोई उत्पन्न जवळपास $2.1 ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.

Pune News : पुणेकरांनो मालमत्ता कर भरण्याची मुदत वाढली, महापालिकेने घेतला मोठा निर्णय…

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या संशोधन अहवालात जीडीपीमध्येही वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे. तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुरजरातसह आंध्र प्रदेशातून जीडीपीच्या 20 टक्के वाढणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. तसेच राज्यांचं दरडोई उत्पन्न $6000 इतकं असणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्याचे दरडोई उत्पन्न $2000 च्या खाली राहणार असल्याचं अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, दरडोई उत्पन्नात भारत सध्या जगातील 127 देशांच्या मागे असून जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतात गरीबी आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी आहे. त्यामुळे ही अर्थिक विषमता भारतासाठी चिंतेची बाब आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube