Download App

Jawan: ‘जवान’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये किंग खानचा जबरदस्त डान्स! Video Viral

Shah Rukh Khan At Jawan Event: मनोरंजनचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या आगामी सिनेमाची त्याचे सर्व चाहते वाट बघत आहे. त्याचा हा सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी आता अवघे काही दिवस राहिले आहेत. ‘जवान’च्या प्रमोशनसाठी किंग खानने (King Khan) चेन्नईमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये किंग खानचे हजारो चाहते उपस्थित होते. किंग खान केव्हाही एखाद्या कार्यक्रमात जातो, तेव्हा तो तिथे धुमाकूळ घालत असतो. असाच काहीसा प्रकार या कार्यक्रमात देखील घडल्याचे बघायला मिळाले आहे. चेन्नईमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये किंग खानने जोरदार डान्स केला आहे, ज्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. यामध्ये एका व्हिडीओत किंग खान स्टेजवर धमाल डान्स करत असताना बघायला मिळाला आहे.

यानंतर स्टेजवर तो ‘जवान’च्या ‘जिंदा बंदा’ गाण्याच्या तमिळ व्हर्जनवर थिरकताना पाहायला मिळाला आहे. यावेळी कार्यक्रमाच्या सूत्रधारही त्यांच्याबरोबर नाचताना दिसत आहेत. किंग खान या धमाल डान्सने कार्यक्रमाचे वातावरण बदलून टाकले आहे. तसेच किंग खानचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो त्याच्याच सिनेमा चेन्नई एक्स्प्रेसमधील ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यावर डान्स करताना असल्याचे बघायला मिळत आहे. त्याचा हा डान्सही अप्रतिम झाला आहे.

Rajkummar Rao Birthday: एकेकाळी पार्ले-जी खाऊन उदरनिर्वाह करणारा हा अभिनेता आता बनलाय सुपरस्टार

किंग खानच्या चाहत्यांना सोशल मीडियावर हे व्हिडीओ खूप लाईक्स केले आहेत. चेन्नईच्या श्री साईराम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिग्दर्शक ऍटली, साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती, सुनील ग्रोव्हर यांसारखे स्टार्सही किंग खानबरोबर एकत्र आले होते.

चेन्नईनंतर आता गुरुवारी सायंकाळी दुबईमध्येही एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. किंग खान ‘जवान’च्या निमित्ताने बुर्ज खलिफा येथे कार्यक्रम करणार आहे. यावेळी ‘जवान’चा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘जवान’च्या ट्रेलरची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे. परंतु हा बहुप्रतिक्षित सिनेमा ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. किंग खानची जोडी पहिल्यांदाच साऊथ अभिनेत्री नयनतारासोबत दिसणार आहे. या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोणही कॅमिओ करताना दिसणार आहे.

Tags

follow us