Download App

Jawan चित्रपटाच्या कमाईत घसरण; ६व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले फक्त ‘इतके’ कोटी

  • Written By: Last Updated:

Jawan Box Office: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुखचा  (Shah Rukh Khan) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले आहे. (Jawan Box Office Collection) या सिनेमाला चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद देखील मिळत आहे. (Bollywood) परंतु आता सिनेमाच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाच्या कमाईचे आकडे सध्या समोर आले आहे.


जवानने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईमध्ये घट झाली होती. दुसऱ्या दिवशी सिनेमाने ५३ कोटी रुपये कमावले आहेत. यानंतर तिसऱ्या दिवशी सिनेमाने ७७ कोटी ८३ लाख रुपयांची कमाई केली. चौथ्या दिवशी सिनेमाने ८१ कोटी रुपये कमावले आहेत.

आतापर्यंतची सर्वाधिक कमाई ठरली होती. पाचव्या दिवशी सिनेमाने ३२.९२ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तर सहाव्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. सिनेमाने २६.५० कोटीचा गल्ला आतापर्यंत कमावला आहे. ‘जवान’ सिनेमाने आतापर्यंत ३४५.५८ कोटी रुपये कमावले आहे. जागतिक स्तरावर जवानने जवळपास ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. जवानने कमाईच्या बाबतीत अनेक अनोखे रेकॉर्ड केले आहेत. परंतु आता कमाईमध्ये घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे.

Box Office: ‘जवान’चा जलवा कायम… ५ दिवसात २७८ कोटींची कमाई; हे फक्त किंग खानच करू शकतो

या सिनेमाचं दिग्दर्शन ॲटली यांनी केलं असून निर्मिती गौरी खानने केली आहे. सिनेमा ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून प्रमुख भूमिकेत शाहरूख खान, नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, अश्लेषा ठाकूर, लहर खान, रिद्धी डोगरा, संजीता भट्टाचार्य, गिरीजा ओक आणि आलिया कुरेशी हे सेलिब्रिटी आहेत. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगू या तीन भाषेमध्ये ‘जवान’ थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Tags

follow us