Download App

Box Office: ‘सालार’मुळे बिघडला ‘डंकी’चा खेळ, किंग खानच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हालत खराब

Dunki Box Office Collection Day 11: शाहरुख खान (Shah Rukh Khan) स्टारर ‘डंकी’ (Dunki Movie) हा 2023 सालचा मोस्ट अवेटेड चित्रपट होता. चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, ‘डंकी’ला मोठ्या पडद्यावर प्रभासच्या (Prabhas) सालारशी (Salaar Movie) स्पर्धा करावी लागली, त्यामुळे किंग खानच्या चित्रपटाच्या कमाईवरही मोठा परिणाम झाला आणि तो अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. दुस-या आठवडय़ात पोहोचताच चित्रपटाची कमाईही सिंगल डिजिटमध्ये कमी झाल्याचे दिसत होते. मात्र, दुसऱ्या रविवारी चित्रपटाच्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून आले. ‘डंकी’ने रिलीजच्या 11व्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला.

‘डंकी’ने रिलीजच्या 11व्या दिवशी किती कमाई केली? ‘डंकी’ हा शाहरुख खानचा 2023 मधील तिसरा चित्रपट आहे. याआधी किंग खानच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ने जबरदस्त कामगिरी केली होती आणि हे चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरले होते. तर ‘डंकी’ने 29.2 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. यानंतर चित्रपटाने चांगले कलेक्शन केले आणि पहिल्या आठवड्यात 160.22 कोटींचा व्यवसाय केला.

आता हा चित्रपट रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात असून त्याच्या कमाईत घट दिसून येत आहे. दुसऱ्या शुक्रवारीही ‘डंकी’चे कलेक्शन सिंगल डिजिटवर आले आणि त्याने 7 कोटी रुपये कमवले. दुसऱ्या शनिवारी चित्रपटाची कमाई 9 कोटी रुपये होती. आता ‘डंकी’च्या रिलीजच्या 11व्या दिवसाच्या म्हणजेच दुसऱ्या रविवारच्या कमाईचे आकडेही आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘Dinky’ ने रिलीजच्या 11व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी 12 कोटी रुपये कमवले आहेत. यासह ‘डंकी’ची 11 दिवसांची एकूण कमाई आता 188.22 कोटी रुपये झाली आहे.

Box Office: रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ने रचला नवा विक्रम, शाहरुख खानच्या ‘पठाण’ला टाकले मागे

‘डंकी’ने जगभरात किती कमाई केली? ‘डंकी’ला जगभरातील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून जागतिक बॉक्स ऑफिसवरही तो चांगली कमाई करत आहे. रेड चिली एंटरटेनमेंटने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, ‘डंकी’ने आतापर्यंत जगभरात 361.30 कोटी रुपये कमवले आहेत.

‘डंकी’ स्टार कास्ट: शाहरुख खानसोबत बोमन इराणी, तापसी पन्नू, विक्की कौशल, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हरसह अनेक कलाकारांनी ‘डंकी’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. JIO स्टुडिओज, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स प्रस्तुत, राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे.

follow us