Box Office Collection: 2024 वर्ष सुरू झाले आहे. 2023 प्रमाणेच 2024 मध्येही शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जादू पाहायला मिळणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ (Dunki Movie) हा चित्रपट 2023 प्रमाणेच 2024 मध्येही धमाल करण्यासाठी सज्ज आहे. ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) दमदार कामगिरी करत आहे. किंग खानचा चित्रपट ‘डंकी’ आणि सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) चित्रपट ‘सालार’ यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळत आहे. ‘सालार’ सारख्या मोठ्या अॅक्शन चित्रपटाशी टक्कर होऊनही हा चित्रपट केवळ पडद्यावर टिकला नाही तर शाहरुख खानचा 2023 चा तिसरा ब्लॉकबस्टर ठरला आहे.
गेल्या आठवड्यात दोन्ही चित्रपटांनी कमाईचे चांगले आकडे समोर आले आहेत. रिलीजच्या दुसऱ्या सोमवारीही या दोन्ही चित्रपटांनी आपली पूर्ण ताकद दाखवली. त्यामुळे दोन्ही चित्रपटांनी चांगलीच जोरदार कमाई होत आहे. ‘डंकी’ने केवळ देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरच दमदार कलेक्शन केले नाही तर जगभरातून चांगली कमाई केली आहे.
या चित्रपटाने जगभरात 400 कोटींचा गल्ला गाठला आहे. या चित्रपटाने 11 दिवसांत जगभरात 380.60 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी ‘डंकी’नेही देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांची कमाई केली आहे. शिवाय रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘अॅनिमल’ चित्रपट रिलीज होऊन एक महिना उलटूनही बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. हा चित्रपट दररोज करोडोंचा गल्ला कमावत आहे. ‘डंकी’चे 12व्या दिवसाचे कलेक्शन आणि अॅनिमलची आतापर्यंतची एकूण कमाई पाहूया.
‘डंकी’ बॉक्स ऑफिस कलेक्शन: Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, रिलीजच्या दुसऱ्या सोमवारी 9.25 कोटी रुपये कमवले आहेत. यासह ‘डंकी’ची 12 दिवसांची एकूण कमाई आता 196.97 कोटींवर पोहोचली आहे. रेड चिली एंटरटेनमेंटने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ‘डंकी’च्या 11 दिवसांत जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर सिनेमाने 380.60 कोटी रुपये कमवले आहेत. ‘डंकी’ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर 160 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला. या चित्रपटाने जवळपास 30 कोटींची ओपनिंग केली होती. या चित्रपटाने जवळपास 30 कोटींची ओपनिंग केली होती. शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू आणि बोमन इराणी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विकी कौशलनेही या चित्रपटात काम केले आहे.
Randeep Hooda: लग्न तर खूप संस्कारांनी केलं अन् आता.. हनिमूनच्या फोटोंमुळे अभिनेता ट्रोल
‘अॅनिमल’चे वादळही सुरूच: संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. टीका होऊनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘अॅनिमल’ ने रिलीजच्या 32 व्या दिवशी 1.35 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यासह अॅनिमलची एकूण कमाई 546.28 कोटींवर पोहोचली आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटात रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना यांचा समावेश आहे. तृप्ती डिमरीसह अनेक स्टार्सनी आपले दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.