Download App

Box Office: किंग खानची जगभर चर्चा! रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी ‘डंकी’च्या कमाईत घसरण

Dunki Movie Box Office Collection Day 2: शाहरुख खानने (Shah Rukh Khan) या वर्षात एकामागून एक दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत. आधी ‘पठाण’ आणि नंतर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. आता 21 डिसेंबरला त्याचा या वर्षातील तिसरा आणि शेवटचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie ) प्रदर्शित झाला, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवत नाहीये. पहिल्या दिवशीच या चित्रपटाने केवळ 30 कोटी रुपयांची कमाई केली, (Dunki Movie Box Office Collection Day 2) जी दुसऱ्या दिवशीही कमी होती. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी ‘डंकी’ने 29 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन 49.20 कोटी रुपये झाले आहे.

गुरुवारी, ‘डंकी’ ची एकूण व्याप्ती 29.94 टक्के दिसली. NCR मध्ये 1412 शो होते, यामध्ये सुमारे 31 टक्के ऑक्युपन्सी होते आणि मुंबईत 1081 शो होते. यामध्ये सुमारे 29.75 टक्के व्याप होता. मात्र शुक्रवारी या चित्रपटाला प्रशांत नीलच्या ‘सालार’शी टक्कर करावी लागली. जे देशभरातील अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. प्रभास स्टारर ‘सालार’ने ‘डंकी’चा सहज पराभव केला आहे. प्रभासच्या चित्रपटाने भारतात 112 कोटींची ओपनिंग केली आहे.

जरी हा शाहरुख खानचा वर्षातील सर्वात कमी यशस्वी चित्रपट असला तरीही या चित्रपटाने 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘झिरो’ पेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ‘झिरो’ने पहिल्या दिवशी 19.35 कोटी रुपयांची कमाई केली होती, आणि त्या चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन 90.28 कोटी रुपये होते.

Satyashodhak : फुले दाम्पत्याची संघर्षमय गाथा झळकणार मोठ्या पडद्यावर; ‘सत्यशोधक’ चा ट्रेलर लॉन्च!

‘डंकी’ दिग्दर्शक राजकुमार हिरानी त्याच्या यशस्वी ट्रॅक रेकॉर्डसाठी ओळखले जातात. पण सध्या चित्रपटाचे दोन दिवसांचे कलेक्शन त्याच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘संजू’पेक्षा मागे आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 34.75 कोटींची कमाई केली. चित्रपटाचे कलेक्शन 342.53 कोटी होते.

Tags

follow us