Download App

Shah Rukh Khan: समीर वानखेडेंवर EDची कारवाई होताच, शाहरुखचं ‘जुने’ ट्विट व्हायरल, म्हणाला…

Shah Rukh Khan Sameer Wankhede : बॉलीवूडचा किंग शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा आता परत एकदा त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. (King Khan) गेल्या वर्षी त्याच्या मुलाला आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणात (Drug case) एनसीबीने अटक केली होती. समीर वानखेडे (Sameer Wankhede ) या अधिकाऱ्याने ही कारवाई केली होती. आता त्याच अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याचे समजताच किंग खानने ‘एक’ ट्विट सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या त्या क्रुझमध्ये सुरु असणाऱ्या पार्टीत ड्रग्जचा समावेश असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. यानंतर त्या क्रुझवर छापा टाकण्यात आला होता. त्यामध्ये बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खानच्या मुलाला आर्यन खानला अटक करण्यात आली होती. साऱ्या देशाचे लक्ष त्या घटनेकडे लागले होते. मीडिया देखील या प्रकरणाकडे चांगलेच लक्ष केंद्रित केल होते.

त्यावेळेस कारवाई करणारे अधिकारी समीर वानखेडे यांची चांगलीच चर्चा रंगली होती. समीर वानखेडे यांनी वैयक्तिक आकसापोटी ही कारवाई केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगल्याचे चांगलंच दिसून येते होते. अशातच आता भ्रष्टाचाराच्या आरोप झाल्याप्रकरणी समीर वानखेडेंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. यानंतर किंग खान म्हणजेच शाहरुखचे जुने ट्विट पुन्हा एकदा व्हायरल झाले आहे.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

त्यामध्ये किंग खानने कर्मा थिएरीचे उदाहरण दिले होते. त्यावरुन चाहत्यांनी वानखेडे यांच्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आर्यन खानला कोर्टाने दिलासा दिला. त्यानंतर वानखेडे यांची बदली करण्यात आली होती. यासर्वामध्ये वानखेडे यांच्यावर कारवाई झाल्यावर पुन्हा ते ट्विट चर्चेत आले आहे. तुम्ही जसे काम करता तसेच फळ तुम्हाला मिळत असते. अशा आशयाचे ते ट्विट असून ते वानखेडे यांना टॅग करण्यात आले आहे. त्यावेळी किंग खानने तुम्ही जसे कर्म करता तसे तुम्हाला फळ मिळते. अशा शब्दांत उत्तर दिले होते. परंतु वानखेडेंवर कारवाई झाल्यावर किंग खानचे ३ महिन्याअगोदरचे ते ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. त्यावर चाहत्यांनी देखील भलत्याच भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Tags

follow us