Shah Rukh Khan’s ‘King’ to release on December 24 : 2026 च्या अखेरीस येणाऱ्या ‘किंग’वर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. ही फिल्म ख्रिसमसच्या मुहूर्तावर, 24 डिसेंबर 2026 रोजी रिलीज होणार आहे. ही तारीख ‘किंग’ला वर्षाचा धमाकेदार क्लोजर देण्यासोबतच २०२७ ची जोरदार सुरुवात करणारी फिल्म बनवते. शाहरुख खान आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ‘पठाण’च्या 3 वर्षांच्या वर्धापनदिनाच्या आधीच हा मोठा ऐलान केल्याने, या ब्लॉकबस्टर जोडीच्या पुनरागमनाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
रिलीज डेटसोबतच मेकर्सनी ‘किंग’च्या दुनियेची पहिली झलकही शेअर केली आहे. यात शाहरुख खान नव्या, बोल्ड आणि दमदार अवतारात दिसत आहेत. भव्य लोकेशन्स आणि स्ट्रॉन्ग व्हिज्युअल्ससह सादर केलेले हे फ्रेम्स एक्साइटमेंटला नवा बूस्ट देतात. आता फक्त 11 महिन्यांची प्रतीक्षा वर्षाअखेरीस ‘किंग’ची दहाड ऐकू येणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने ‘बॅटल ऑफ गलवान’मधील देशप्रेम जागवणारे पहिले गाणे ‘मातृभूमी’ प्रदर्शित
2 नोव्हेंबरला शाहरुख खानच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या जबरदस्त टायटल रिव्हीलने सोशल मीडियावर खळबळ उडवली होती. सिल्व्हर हेअर, अॅक्शनने भरलेला लूक, SRK-स्पेशल थीम सॉन्ग आणि दमदार डायलॉग “डर नहीं, दहशत हूं” यांनी चाहत्यांना वेड लावलं. आता रिलीज डेट जाहीर झाल्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीच वाढली आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांच्या बॅनरखाली बनणारी ‘किंग’ 2026 मधील सर्वाधिक प्रतीक्षित बिग-स्क्रीन फिल्म ठरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
