Jawan Box Office Collection: किंग खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास; कमावले ‘इतके’ कोटी

Jawan Box Office Collection: ‘जवान’ (Jawan Hindi Cinema) सिनेमाने प्रदर्शनाच्या अगोदरच जोरदार कमाई (Box Office ) केली होती. आता प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी एकून किती कमाई झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वांचं उत्सुक लागली आहे. बॉलिवूडचा (Bollywood) शहेनशाह, किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘झीरो’ सिनेमा सुपर फ्लॉप ठरल्यावर तब्ब्ल ४ वर्षांनंतर […]

Jawan Censor Board Certificate

Jawan Censor Board Certificate

Jawan Box Office Collection: ‘जवान’ (Jawan Hindi Cinema) सिनेमाने प्रदर्शनाच्या अगोदरच जोरदार कमाई (Box Office ) केली होती. आता प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी एकून किती कमाई झाली आहे, हे जाणून घेण्यासाठी सर्वांचं उत्सुक लागली आहे. बॉलिवूडचा (Bollywood) शहेनशाह, किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानने (Shah Rukh Khan) ‘झीरो’ सिनेमा सुपर फ्लॉप ठरल्यावर तब्ब्ल ४ वर्षांनंतर ‘पठाण’ या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक केले आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच इतिहास रचला.


तसेच आता किंग खानचा ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने देखील प्रदर्शनाच्या अगोदर जोरदार कमाई करत एक अनोखा रेकॉर्ड ब्रेक केले आहे. आता पहिल्या दिवशी या सिनेमाने किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘जवान’ सिनेमाने पहिल्या दिवशी ७५ कोटीचा गल्ला कमावला आहे. हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाने ६५ कोटी रुपये कमावले आहेत.

तसेच तमिळमधील सिनेमाने ५ कोटी आणि तेलुगूमधील सिनेमाने ५ कोटी रुपये कमावले आहेत. किंग खानच्या पठाण सिनेमाने पहिल्या दिवशी ५७ कोटीचा गल्ला कमावला होता. तर दुसऱ्या दिवशी ७०.५० कोटी कमावले होते. आणि पाचव्या दिवशी देखील पठाणने ६०.७५ कोटी कमावले होते. सर्वाना आता मोठी आशा आहे की ‘जवान’ हा सिनेमा कमाईच्या बाबतीत पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करणार आहे.

Jawan Review: शेतकऱ्यांची आत्महत्या अन् ट्रॅक्टरवर १३ टक्के व्याज…किंग खानचा ‘जवान’ देतोय खास मेसेज

तसेच सध्या ‘जवान’ची ७ लाखांहून अधिक तिकिट अ‍ॅडव्हांस बुकिंगमध्ये विकली गेल्याची देखील माहिती मिळाली होती. या सिनेमाने अ‍ॅडव्हांस बुकिंगच्या ३ दिवसामध्येच सुमारे २१.१४ कोटीचा गल्ला कमावला आहे. ‘जवान’ या सिनेमात किंग खानबरोबर नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारख्या अभिनेत्रीही झळकले आहे. दीपिका पदुकोण, विजय सेतुपती हे कलाकार देखील सिनेमात बघायला मिळत आहे.

Exit mobile version