Ask SRK : पठानचा ‘हा’ सीन शूट करताना शाहरूखला फुटला होता घाम

मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा ‘पठान’ चित्रपट महिनाभरानंतरही भरघोस कमाई करत आहे. शाहरुखच्या मोठ्या पडद्यावरील कमबॅकची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. त्यानंतर पठान चित्रपटाच्या यशाने शाहरूखच कमबॅक दमदार केलं आहे. यादरम्यान शाहरुख खानने चाहत्यांसाठी ट्विटरवर आस्क एसआरके (AskSRK) सेशन ठेवलं. त्याने विविध प्रश्नांचे उत्तर दिली. एका चाहत्याने शाहरुखला विचारलं की, ‘पठान’ […]

Pathan

Pathan

मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा ‘पठान’ चित्रपट महिनाभरानंतरही भरघोस कमाई करत आहे. शाहरुखच्या मोठ्या पडद्यावरील कमबॅकची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. त्यानंतर पठान चित्रपटाच्या यशाने शाहरूखच कमबॅक दमदार केलं आहे. यादरम्यान शाहरुख खानने चाहत्यांसाठी ट्विटरवर आस्क एसआरके (AskSRK) सेशन ठेवलं. त्याने विविध प्रश्नांचे उत्तर दिली. एका चाहत्याने शाहरुखला विचारलं की, ‘पठान’ च्या शूटिंग दरम्यान कोणता सीन शूट करणं कठीण होता?

Pathan : शाहरुखचा पठाण 1000 कोटींच्या पार

चाहत्याच्याया प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला, ‘बॉडी शॉट्स. मी त्यावेळी खूप लाजत होतो.’ शाहरुखने या सेशनमध्ये ‘पठाण’संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. याशिवाय आस्क एसआरकेमध्ये किंग खानचे चाहते त्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले, ज्यांची शाहरुखने येथे मोकळेपणाने उत्तरे दिली.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित यशराज फिल्म्सचा ‘पठाण’(Pathan) या सिनेमाने देशात आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे. या सिनेमाने जगभरता आजपर्यंत ९४६ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा आज १००० कोटींचा टप्पा पार करेल. या सिनेमात शाहरुख खान ( Shahrukh Khan) मुख्य भूमिकेत आहे.

चौथ्या रविवारी ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर पुन्हा दमदार झेप घेतली. या चित्रपटाने भारतात ४.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पठाण’ने आता एकट्या परदेशात ४५.७२ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली आहे, तर भारतात नेट कलेक्शन ५१५.६७ कोटी एवढे आहे. पठाण सिनेमाची जगभरातील एकूण कमाई ९९६ कोटी एवढी आहे. त्यापैकी भारतामध्ये ६२१ कोटी तर परदेशात ३७५ कोटींची कमाई केली आहे.

Exit mobile version