Download App

Shanta Tambe: अभिनेत्री शांता तांबे यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shanta Tambe Passed Away: मराठी सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी सिनेमासृष्टीत विशेष ओळख निर्माण केली आहे. (Marathi Movie) शांता तांबे यांनी नाटकामध्ये काम करुन अभिनयक्षेत्रात आपले नाव पदार्पण केले आहे. (Shanta Tambe Passed Away) देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकातून त्यांना मोठी ओळख मिळाली होती.

अभिनेत्री शांता तांबे यांनी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने आदी दिग्गज दिग्दर्शकांबरोबर यांनी काम केले आहे. तसेच मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी अशा अनेक सिनेमामधून ते चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने सिनेमामध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतीत सांगितले होते.

त्यांनी दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी या सिनेमामध्ये देखील त्यांनी काम केले होते. एका मुलाखतीमध्ये शांता तांबे यांनी सांगितले होते की, ‘मी जेव्हा अभिनयक्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली होती. तेव्हा आता जसे लोक अभिनय करायचे आहे, अशा उद्देशाने या क्षेत्रामध्ये येतात तशा मी या उद्देशाने या क्षेत्रात आले नव्हते. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने मी या क्षेत्रात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा

परंतु, अभिनयक्षेत्रात आल्यावर मी या क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे. मला चांगले दिग्दर्शक मिळाले होते. देश बंधू संगीत मंडळी यांच्या नाटकामध्ये मी काम केलं. तसेच सध्याच्या सिनेमाविषयी शांता तांबे म्हणाल्या होत्या की, ‘आताचे सर्व सिनेमे हे कॉमिक आहेत. ते सिनेमा सर्व चांगले आहे. त्याकाळातील कथानक वेगळे आणि आताचे वेगळे आहेत. दिग्दर्शक देखील वेगळे असतात. त्यांचे काम देखील वेगळे असते. आम्हाला त्या काळी चांगले दिग्दर्शक मिळाले होते. असे त्यांनी यावेळी सांगितले होते.

Tags

follow us