Download App

Sharad Ponksheनी सांगितला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ नाटकाचा ‘तो’ किस्सा; म्हणाले, ‘नाटकाची बस जाळली…’

Sharad Ponkshe: सुप्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे त्यांच्या अभिनयासोबतच देशाचा इतिहास, राजकीय परिस्थिती आणि सामाजिक घडामोडी याबद्दल आपली परखड भूमिका मांडत असतात. त्यांनी केलेली नाटक, सिनेमा, (Marathi drama) आणि सीरियामध्ये दमदार अभिनय करून स्वत:ची एक अनोखी ओळख निर्माण केल्याचे बघायला मिळत असते. (Me Nathuram Godse Boltoy) शरद पोंक्षेंची मुख्य भूमिका असलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक जोरदार गाजले होते. या नाटकाचे प्रयोग २०१७ मध्ये थांबवण्यात आले होते. परंतु आता ऑक्टोबरमध्ये हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर बघायला मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

शरद पोक्षेंना ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’या नाटकाच्यावेळेस अनेक प्रसंगांना सामोर जावे लागल्याचे बघायला मिळाले आहे. त्यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान एक रंजक असा किस्सा सांगितला आहे. कायदेशीर लढा दिल्यावर या बहुचर्तित नाटकाला सेन्सॉर सर्टिफिकेट देण्यात आले होते, आणि १० जुलै १९९८ साली पहिला प्रयोग पार पडला होता. याबद्दल सांगत असताना शरद पोंक्षेनी सांगितलं की, एखाद्या नटाने या नाट्यसृष्टीमध्ये ४० ते ५० वर्ष काम केल्यावर त्याला जे अनुभव येत आहेत ते सर्व अनुभव मला या एकाच भूमिकेने दिल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.


तसेच शरद पोंक्षे पुढे म्हणाले की, मला अक्षरशः पेट्रोल बॉम्ब टाकून जाळण्यापासून ते आमच्या नाटकाची संपूर्ण बस जाळण्यापर्यंत या सर्व गोष्टी मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या आहेत. एवढंच नाही तर रंगमंचावर देखील नाटक सुरु असताना कॉंग्रेसचे ५० ते ६० लोक एकदम वर येऊन मला घेराव घालून उभे राहत असायचे. असे अनेक अनुभव मला या नाटकामधून अनुभवायला मिळाला आहे. हे सर्व अनुभव घेत असताना रसिक प्रेक्षकांनी कधीच हाऊसफुलचा बोर्ड खाली उतरू दिला नसल्यचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.

KBC’ मध्ये अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं पाहा…

महाराष्ट्रातील रसिकांच आभार देखील मानले पाहिजे, कारण बाहेर शरद पोंक्षे मुर्दाबाद, नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी की जय असं म्हणत असताना देखील या परिस्थितीतून सुद्धा प्रेक्षक नाटक बघायला येत असत. तसेच आमचे प्रयोग देखील कायम हाऊसफुल्ल होत होते. २० वर्षामध्ये ११०० प्रयोग केले आहेत. परंतु आमचा एकही प्रयोग रिकामी गेले नसल्यचे त्यांनी यावेळी सांगितले आहे… तसेच सर्वच प्रयोग हाऊसफुल झाले. आम्हाला एकदाही प्रयोग रद्द केला नाही. मी कधीही घाबरलो नाही…माझ्या आजूबाजूंनी लोक येऊन मला घेराव घालत असायचे. या सगळ्यामध्ये मी अगदी जोमाने उभा राहिलो. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे आमच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे राहत असायचे, असं शरद पोंक्षेनी यावेळी सांगितलं.

तसेच सध्या शरद पोंक्षे ‘झी मराठी’वरील ‘दार उघड बये’ या सीरियामध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याचे बघायला मिळत आहे. आणि लवकरच त्यांचे बहुचर्चित नाटक ‘नथुराम गोडसे बोलतोय’ हे पुन्हा एकदा रंगमंचावर धुमाकूळ घालताना बघायला मिळणार आहे.

Tags

follow us