Anupam Mittal Father Death: शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाचे परीक्षक आणि प्रसिद्ध उद्योजक अनुपम मित्तल (Anupam Mittal) यांच्या वडील गोपाल कृष्ण मित्तल (Gopal Krishna Mittal ) यांचे आज निधन झाले आहे. अनुपम हे त्यांच्या वडिलांबरोबरचे फोटो अनेकवेळा सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोमवारी (29 मे) अनुपम मित्तल यांची पत्नी आंचल कुमार यांनी इन्स्टाग्रामवर एक थ्रोबॅक फोटो शेअर केला होता.
या फोटोला अनुपम यांनी रिपोस्ट करुन लिहिलं, “Shine on Us Daddy.” शार्क टँक इंडियाच्या एका एपिसोडमध्ये, अनुपम मित्तल यांनी त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रवासात कशी प्रेरणा दिली, याबाबत सांगितले आहे. एक आठवण सांगत असताना अनुपम म्हणाले होते की, त्यांचे वडील हातमाग व्यवसायामध्ये होते. लहान असताना अनुपम हे बाबांचे बोट धरून त्यांचे काम बघत होते. तेव्हाच त्यांच्या मनात उद्योजक होण्याविषयी विचार येत होते. अनुपम मित्तल यांनी गेल्या वर्षी त्यांच्या बाबांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
या फोटोमध्ये गोपाल मित्तल हे केक कट करत असल्याचे दिसून येत आहे. या फोटोला अनुपम यांनी कॅप्शन देखील दिले आहे, ‘फादर्स डेच्या शुभेच्छा बाबा… तुमची मोठ्या मन हे प्रेरणादायी आहे. आशा आहे की एक दिवस मी तुमच्या सारखा होणार असल्याचे यावेळी त्याने सांगितले आहे. शार्क टँक इंडिया या कार्यक्रमामुळे अनुपम मित्तल यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. अनुपम मित्तल प्रसिद्ध उद्योजक आहेत, ते पीपल ग्रुपचे मालक आणि Shaadi.com या लोकप्रिय प्लॅटफॉर्मचे संस्थापक आहेत.
‘मुस्लिमांचा द्वेष ही एक फॅशन बनली, सरकारकडून….’; नसीरुद्दीन शाह यांचे मोठे विधान
गेल्या काही दिवसांपूर्वी अनुपम मित्तल यांच्या हाताला दुखापत झाली होती. यामुळे ते चर्चेत येत होते. याबात अनुपम यांनी याबद्दल सोशल मीडियावर माहिती देखील दिली होती. शार्क टँक इंडिया या कार्यक्रमाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. या कार्यक्रमामध्ये अनुपम मित्तल यांच्याबरोबर ‘बोट’ कंपनीचे को सह-संस्थापक अमन गुप्ता, ‘लेंस्कार्ट’ कंपनीचे संस्थापक पीयुष बंसल, ‘शुगर कॉस्मेटिक्स’ कंपनीच्या सह-संस्थापक विनीता सिंह आणि ‘एमक्योर फार्मास्युटिकल्स’च्या कार्यकारी संचालक नमिता थापरही हे परीक्षकाची भूमिका साकरत असल्याचे दिसून येत आहे.