Download App

Sharvari Wagh: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातीचे जबरदस्त मंडे मोटिवेशन, ‘अल्फा’च्या शूटिंगसाठी सज्ज

Sharvari Wagh Upcoming Alpha Movie Shooting: मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ, मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे

Sharvari Wagh Upcoming Alpha Movie Shooting: मराठी कुटुंबात जन्मलेली शर्वरी वाघ, मुंज्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली आहे  (Sharvari Wagh). तिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात लीड रोलमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे (Bollywood). शर्वरीने नुकतंच मुंज्या (MUNJYA Movie) चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. आता लवकरच आपल्या पुढील चित्रपट ‘अल्फा’ची (Alpha Movie) शूटिंग सुरू करणार आहे, जो YRF स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे.


या चित्रपटात ती सुपरस्टार आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) काम करत आहे. ‘अल्फा’ची शूटिंग सुरू करण्याच्या काही दिवस पूर्वीच, शर्वरीने सोशल मीडियावर जबरदस्त फिटनेस गोल्स देत मंडे मोटिवेशनचे डोस दिले आहेत. शर्वरीने आपल्या फॅन्स आणि इंटरनेटवरच्या लोकांना आग्रह केला की त्यांनी कधीही सोमवारचा वर्कआउट मिस करू नये, आणि यासाठी तिने काही जबरदस्त फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप फिट आणि तंदुरुस्त दिसत आहे!

शर्वरी लवकरच निखिल आडवाणीच्या बहुप्रतिक्षित ‘वेदा़’ आणि मग आदित्य चोपड़ा यांच्या ‘अल्फा’मध्ये दिसणार आहे. ‘अल्फा’चे दिग्दर्शन YRF चे तरुण आणि प्रशंसित दिग्दर्शक शिव रवैल करत आहेत, ज्यांनी ‘द रेलवे मेन’मुळे ख्याति मिळवली आहे.

Sharvari Jamenis: अभिनेत्री शर्वरी जमेनीसचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण!

आलिया – शर्वरी ‘अल्फा’मध्ये सुपर एजंट

बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्यासोबत ‘मुंज्या’ फेम अभिनेत्री शर्वरी वाघही आहे. YRF च्या आदित्य चोप्रा यांनी स्पाय युनिव्हर्समधील ‘अल्फा गर्ल्स’ म्हणून या दोघींच्या सिनेमाला प्रेझेंट केलंय. केवळ पुरुष नाही तर महिलाही अल्फा असू शकतात, असा एक अनोखा संदेश ‘अल्फा’मधून देण्यात येणार आहे.

follow us