Shilpa Shetty Ganpati Visarjan: शिल्पा शेट्टी कुंद्राचा गणेश चतुर्थी विसर्जन सोहळा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला . यंदाच्या या उत्सवात नाशिकच्या सर्व मुलींच्या ढोल बँडचा समावेश होता (Social media) आणि या कारणांनी हा विसर्जन सोहळा अजून खास झाला. ज्यामध्ये पारंपारिक तालवाद्यांमध्ये पारंगत असलेल्या २१ प्रतिभावान महिलांचा सहभाग होता.
शिल्पा शेट्टी नेहमीच मोठ्या दिमाखात सगळे उत्सव साजरे करताना दिसते आणि प्रत्येक उत्सव खास करण्यासाठी ती स्वतः हुन पुढाकार घेते. घरच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना तिने अगदी वाजत गाजत यंदा बाप्पाला निरोप देऊन पुढल्या वर्षी लवकर या… असा जयघोष बघायला मिळाला आहे. शिल्पा शेट्टी कायम सर्व सण – उत्सव साजरे करताना दिसते. प्रत्येक उत्सव खास करण्यासाठी ती स्वतः हुन पुढाकार घेते. घरच्या बाप्पाला देखील तिने भक्तिभावाने निरोप दिल्याचे बघायला मिळाले आहे.
शिल्पा शेट्टी नाशिक ढोलच्या तालावर बिनधास्त नाचत होती. (Nashik Dhol Tasha) तिच्या सोबत तिची बहीण सुष्मिता आणि मुलगा देखील नाचत असल्याचे दिसत आहे.शिल्पा शेट्टीने यावेळी मराठमोळा लूक सादर केला आहे. शिल्पा शेट्टीने सुंदर गुलाबी नऊवारी साडी नेसली होती आणि त्यावर साजेसा पिवळा ब्लाउज देखील घातला होता. नाकात नाथ, कंबरेला कंबरपट्टा, केस फुलं देखील तिने माळली होती. अनवाणी जात तिने बाप्पाचं विसर्जन केल्याचे यावेळी बघायला मिळाले आहे.
Nargis Fakhri: गणेश चतुर्थी निमित्त नर्गिस फाखरीने शेयर केल्या खास आठवणी; म्हणाली, ‘गणपती…’
तसेच सोनल जोशी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि शिखा शर्मा निर्मित ‘सुखी’ साठी शिल्पा शेट्टी कुंद्रा सज्ज झाली आहे. या चित्रपटात अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार, कुशा कपिला आणि इतर अनेक कलाकारांचा समावेश आहे, ज्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे आश्वासन दिले आहे. चाहते 22 सप्टेंबर रोजी त्याच्या थिएटरमध्ये रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. शिल्पा शेट्टी कुंद्रा रोहित शेट्टीच्या ‘भारतीय पोलिस दल’ मध्ये पहिल्या महिला पोलिसाच्या भूमिकेत देखील बघायला मिळणार आहे. आणि तिचा ‘KD’ नावाचा कन्नड सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.