Download App

Shilpa Shetty: ‘अक्षय कुमारने माझा वापर..’, शिल्पा शेट्टीने केला होता गंभीर आरोप

Shilpa Shetty Birthday: आज ८ जून रोजी शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आपण जाणून तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. (Shilpa Shetty Birthday) केवळ अभिनयच नव्हे तर सौंदर्याच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. (Happy Birthday Shilpa Shetty) तिने ९०च्या दशकामध्ये स्वतःचे नाव खूपच गाजवले होते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आज ८ जून रोजी शिल्पाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.


बॉलिवूड (Bollywood) इंडस्ट्रीतील दमदार अभिनेत्री आणि आपल्या फिटनेसने कायम सर्वांना चकीत करणारी शिल्पा शेट्टी आज 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पा तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असते. पती राज कुंद्राच्या (Raj Kundra) अश्लील व्हिडीओग्राफी प्रकरणामुळे ती कायम चर्चेत होती. मात्र हे संपूर्ण प्रकरण तिने अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणे हाताळले होते.

लग्नाच्या अगोदर शिल्पाचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते. त्यापैकी एक नाव बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) याचे नाव जोडण्यात आले होते. ‘धडकन’ या सिनेमातील शिल्पा आणि अक्षयची जोडी मोठ्या प्रमाणात गाजली होती. मात्र या सिनेमानंतर दोघांनी पुन्हा एकत्र कधीही काम केले नाही. ९०च्या दशकामध्ये शिल्पा शेट्टीचे नाव अभिनेता अक्षय कुमारशी जोडण्यात आले होते.

शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारने ‘मैं ख‍िलाड़ी तू अनाड़ी’ या सिनेमामध्ये देखील एकत्र स्क्रीन शेअर केले होते. हा सिनेमा १९९४ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमानंतर अक्षय आणि शिल्पाच्या अफेअरच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. पण २ हजार साली त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर खिलाडीने २००१ साली अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले होते. दरम्यान एका मुलाखतीच्या दरम्यान शिल्पाने खिलाडीबरोबरच्या अफेअरवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा पहिल्यांदा तिने यावर मोठं वक्तव्य केले होते.

Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…

खिलाडी शिल्पा सोबत रिलेशनशीपमध्ये होता, तेव्हा तो ट्विंकल खन्नाला देखील डेट करत होता, असा धक्कादायक खुलासा शिल्पाने केला होता. खिलाडीसोबतच्या अफेअर विषयी सांगत असताना शिल्पाच्या डोळ्यात पाणी आले होते. ती म्हणाली की, ‘अक्षयने केवळ माझा वापर केला होता. आम्ही दोघे रिलेशनशीपमध्ये होतो. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी अभिनेत्री आली, त्यावेळेस त्याने मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड आणि कायम राग येत असतो. कारण त्याने मला फसवले आहे. असे तिने यावेळी सांगितले होते.

Tags

follow us