Download App

OTT वर शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ चा मोठा धमाका ! अवघ्या काही तासांतच होतोय ट्रेंड

Shilpa Shetty Sukhi Movie OTT platform: शिल्पा शेट्टी कुंद्राचा (Shilpa Shetty) नवीन चित्रपट ‘सुखी’ (Sukhi Movie) हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. वीकेंडमध्ये नेटफ्लिक्सवर (Netflix) नंबर 1 ट्रेंडिंग चित्रपटाचा स्थान मिळवला आहे. या चित्रपटात शिल्पाला मुख्य भूमिकेत बघायला मिळाली आहे. यामध्ये तिने सुखप्रीत ‘सुखी’ कालरा एक 38 वर्षीय पंजाबी गृहिणीची भूमिका साकारली आहे. शिल्पा शेट्टी कुंद्राने इंस्टाग्रामवर या बद्दल एक रील देखील शेअर केले आहे.


पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शन दिले आहे की, “@netflix_in वर #Sukhee नंबर 1 वर ट्रेंड करत आहे! दिवसाची चांगली सुरुवात करायला सांगता आली नसती! स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी SUKHEE तुमच्यासाठी !

‘सुखी’ची कथा गृहिणीभोवती फिरत आहे. जी 20 वर्षांनंतर त्यांच्या शाळेच्या रियुनियन कार्यक्रमासाठी दिल्लीला जाते. ‘सुखी’ ही प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. बर्‍याच अनुभवांमधून जात असताना, ती पहिल्यांदाच स्वतःला आई आणि पत्नी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून पाहते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला होता. ‘सुखी’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा शर्मा यांनी केली आहे.

Emmy Awards: आंतरराष्ट्रीय पातळीवर जिम सरभने रोवला भारताचा झेंडा; एमी पुरस्कारावर कोरलं नाव

या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत कुशा कपिला, दिलनाज इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाची कथा राधिका आनंदने लिहिली असून पटकथा पाउलोमी दत्ताने लिहिली आहे. शिल्पाचा ‘सुखी’ हा सिनेमा चाहत्यांना प्रेरणा देणारा ठरला असून ती तिच्या आगामी प्रोजेक्ट मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलीवूड आयकॉन रोहित शेट्टीच्या आगामी वेब सिरीज “भारतीय पोलिस दल” मध्ये तिचे बहुप्रतिक्षित OTT पदार्पण करण्यासाठी लवकरच सज्ज होणार आहे. शिल्पा शेट्टी कुंद्राचा “KD- द डेव्हिल” नावाचा एक आशादायक कन्नड चित्रपट देखील लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us