Download App

Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ ओटीटीवर टॉपला !

  • Written By: Last Updated:

Shilpa Shetty Sukhi Top OTT : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राचा (Shilpa Shetty) नवीन सिनेमा ‘सुखी’ ( Sukhee Movie) हा सिनेमा चर्चेचा विषय ठरला आहे. वीकेंडमध्ये नेटफ्लिक्सवर नंबर 1 ट्रेंडिंग सिनेमात त्याने अनोखं स्थान मिळवले आहे. या सिनेमात शिल्पा मुख्य भूमिकेमध्ये आहे. यामध्ये तिने सुखप्रीत ‘सुखी’ कालरा ही एक 38 वर्षीय पंजाबी गृहिणीची भूमिका साकारली आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्रामवर याबद्दलची माहिती देत एक खास पोस्ट शेअर केली आहे.


या पोस्टमध्ये शिल्पा व्यायाम करत टीव्ही पाहत असल्याचे दिसत आहे. यावेळी टिव्हीवर तिचा मराठी ‘सुखी’ ( Sukhee Movie ) सिनेमा नेटफ्लिक्सवर पहिल्या नंबरवर पोहचल्याचे तिने यावेळी दाखविले आहे. यानंतर शिल्पाला खूपच आनंद झाला असून तिने मोठमोठ्याने ओरडताना देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पाच्या घरातील इतर साहित्य दिसत आहे. यामध्ये खास करून, ती ट्रेड मिल वाकिंग मशीनवर व्यायाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करणार’; मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ ट्रेलरला तुफान प्रतिसाद

शिल्पाची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. या पोस्टला कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, ‘@netflix_in वर #Sukhee नंबर 1 वर ट्रेंड करत आहे!, दिवसाची उत्तम सुरुवात झाली, स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकासाठी SUKHEE तुमच्यासाठी !’. शिल्पाचा ‘सुखी’ हा सिनेमा सर्वांना प्रेरणा देणारा ठरला आहे. यानंतर शिल्पा बॉलिवूड आयकॉन रोहित शेट्टीच्या आगामी वेबसिरीज “भारतीय पोलिस दल” मध्ये ओटीटी ( OTT ) पदार्पण करण्यास सज्ज होत आहे. शिवाय शिल्पाचा “KD- द डेव्हिल” नावाचा एक कन्नड सिनेमा देखील लवकरच येणार आहे.

Tags

follow us