Download App

Shiv Thakare : शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा ‘तो’ किस्सा

मुंबई : ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या (Bigg Boss 16) पर्वामधून लोकप्रिय झालेला मराठमोळा मावळा शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच चर्चेत असतो. अमरावतीसारख्या छोट्या शहरातून आलेल्या शिवला काम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले आहे. (Shiv Thakare On Casting Couch) ‘बिग बॉस’मध्ये शिव उपविजेता ठरला असला, तरी त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. यातच त्याने कास्टिंग काउचचा धक्कादायक किस्सा सांगितला आहे.

‘बिग बॉस’हिंदी मधून बाहेर पडल्यावर शिवने ३० लाखांची कार विकत घेतली, तसेच स्वतःचं एक रेस्टॉरंट देखील सुरू केलं आहे. त्याने दिलेल्या ‘हिंदुस्तान टाईम्सच्या’ मुलाखतीमध्ये कास्टिंग काउचबद्दलचा खळबळजनक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला की, मी एकदा आराम नगरमध्ये ऑडिशनकरिता गेलो होतो आणि तिथे एक माणूस मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, ‘इथे मसाज सेंटर आहे. मला ऑडिशन आणि मसाज सेंटरचा काही देखील संबंध लक्षात आला नाही. तो मला म्हणाला, ऑडिशन झाल्यावर एक वेळा तू इथे ये. तू वर्कआउटपण करतोस का? असा सवाल शिवला त्यावेळी त्याला करण्यात आला.

Bholaa मधील अजय देवगणच्या ‘या’ कृतीने पहिल्याच दिवशी जिंकली प्रेक्षकांची मने

त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो. कारण तो कास्टिंग डायरेक्टर होता आणि मला कोणताही वाद करायचा नव्हता. मी सलमान खान नाही. पण या घटनेवर मला एक गोष्ट लक्षात आली की कास्टिंग काउचच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही. तसेच शिवने आणखी एका प्रसंगाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. चार बंगल्यात एक मॅडम होत्या. त्या मला म्हणायच्या, ‘मी याला स्टार बनवलं, मी त्याला स्टार बनवलं.’ त्या नेहमी मला रात्री ११ वाजता ऑडिशनकरिता बोलावत असत.


मी एवढाही भोळा नव्हतो की रात्री काय ऑडिशन्स घेत असतात का? हे मला देखील समजत होत. परंतु त्यांना मी काही कारणे देत असत, मला काम आहे, त्यामुळे मी येऊ शकत नाही, असं त्यांना नेहमीच मी सांगायच. यावर त्या म्हणाल्या, ‘तुला काम नाही करायचं का?’ ‘तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही’ अशा गोष्टी ती नेहमी शिवला सांगायची, असे बोलून ते मला डिमोटिव्हेट करणार, पण त्याची कधी मला पर्वा नसायची, असा धक्कादायक किस्सा शिवने सांगितला आहे.

Tags

follow us