Bholaa मधील अजय देवगणच्या ‘या’ कृतीने पहिल्याच दिवशी जिंकली प्रेक्षकांची मने

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 30T133538.400

Bholaa Movie Review: बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचे (Ajay Devgn) चाहते त्याच्या आगामी ‘भोला’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. भोला हा सिनेमा तामिळ सुपरहिट कैथीचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. (Bollywood Movie) त्याचसोबत त्याने दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळला आहे. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव हे कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा आज ३० मार्चला रामनवमी निमित्त रिलीज झाला आहे.

सिनेमात नेमकं काय आहे खास?

भोला हा सिनेमा 3डी मध्ये देखील रिलीज करण्यात आला आहे. 3D मध्ये भोला पाहणं हा एक खतरनाक अनुभव असणार आहे. सिनेमातली अ‍ॅक्शन, फाईट सीन्स, स्टंट्स या अनेक गोष्टी थरारक बॅकग्राऊंड संगीतामुळे खूपच रंगतदार ठरणार असल्याची चर्चा पहिल्याच दिवशी होत आहे. या सर्व गोष्टी 3D मध्ये बघणं हा एक महत्वाचा अनुभव असणार आहे. रिमेक असला तरीही भोला हा खूपच रंगतदार सिनेमा आहे.

Adipurush : संस्कृतीच्या नावावर हे काय? ‘आदिपुरुष’च्या नवीन पोस्टरवर चाहते नाराज

अजय देवगणने हा मुख्य भूमिकेत जबरदस्त अभिनय केलाय. अभिनय, अ‍ॅक्शन, जॅक्शन अशा सर्वच प्रकारात तो सर्वांवर छाप पाडतो. अजय देवगणच्या तोडीस तोड तब्बू डायना सिंगच्या भूमिकेत दिसून आली आहे. दृश्यम नंतर या अजय आणि तब्बू या दोघांची पडद्यावर ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याचा सुखद आनंदाचा अनुभव आहे. इतर कलाकारांच्या भूमिकेत दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, विनीत कुमार आणि गजराज राव यांनीही आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे साकारले आहेत.

खरं सांगायचं तर अजय देवगण- तब्बू यांची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर कमाल करत आहे. भोला सिनेमाचा थिएटरमध्ये अनुभव घेतल्यास तुम्हाला देखील चांगलीच मजा येणार आहे. तुम्ही जर कैथी हा मूळ सिनेमा बघितल असेल तर नक्कीच काही गोष्टींमध्ये तुमचा रसभंग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण जर तुम्ही मूळ सिनेमा न पाहता भोला बघितला तर तुमचं एंटरटेनमेंट नक्कीच होणार याची खात्री आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube