Gautami Patil: गौतमी पाटीलवरुन राजकारणातील दोन पाटलांमध्ये जोरदार जुंपली

Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील…(Gautami Patil) असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करते. महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी (Gautami Patil) पाटीलची एक झकल पाहण्यासाठी पब्लीक वेडी होते. कुणी छतावर चढतं तर कुणी झाडावर. गौतमी लावणीच्या स्टेजवरुन आता थेट राजकारणातील दोन आमदार आमने- सामने आले आहेत.   View this post on Instagram   A […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 16T124540.839

Gautami Patil

Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील…(Gautami Patil) असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करते. महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी (Gautami Patil) पाटीलची एक झकल पाहण्यासाठी पब्लीक वेडी होते. कुणी छतावर चढतं तर कुणी झाडावर. गौतमी लावणीच्या स्टेजवरुन आता थेट राजकारणातील दोन आमदार आमने- सामने आले आहेत.


राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप मोहिते (MLA Dilip Mohite) यांनी गौतमी पाटील हिची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केली होती. त्यावरून शिवसेनेची माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) यांनी शेलक्या शब्दात आमदार दिलीप माहिते पाटलांचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीचे खेडचे आमदार दिलीप माहिते हा एक वादग्रस्त विधान करणारा अज्ञानिक आमदार आहे, तो वेड्याच्या नंदनवनात जगात असतो, कुणावरही कोणावरही कारण नसताना, तोंडसुक घेणं, आरोप करणं, याची त्यांना सवय आहे.


गौतमी पाटीलची बरोबरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याबरोबर करणं, अतिशय निर्बुद्धपणाचे लक्षण आहे, अशी टीका शिवसेनेची माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी यावेळी केली आहे. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणात तिच्या समर्थनार्थ अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यामध्ये आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील तिला आडनाव बदलायाला लावणाऱ्यांचा तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, ‘तिने लावणी नृत्यांगणा म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आज तिची क्रेझ आहे. कला क्षेत्रात हे कायमस्वरूपी नसतं. आज जे तिच्याबाबतीत घडतय ते प्रत्येक कलाकारासोबत घडतं.’

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

‘आज त्या शिखरावर गौतमी आहे. अशा वेळी तिला ट्रोल करण्यापेक्षा तिची कुचंबना होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. तसेच सध्या जरी तिच्या कार्यक्रमाला गर्दी होत असली तरी जेव्हा तिची परिस्थिती हालाखीची होती. तेव्हा तिला दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं. आता ती तिच्या कर्तृत्वावर पुढे जात आहे तर कुणाच्या पोटात दुखायचं काय कारण.’ अशा शब्दांत अमोल कोल्हेंनी गौतमीनर टीका करणाऱ्यांना खडसावलं आहे.

Exit mobile version