Shivba Naav Marathi Song : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण रयतेचे आदरस्थान आहेत. अशा धाडसी, शूर, पराक्रमी जाणता राजाचे स्तुतीपर गाणे (Shivba Naav Marathi Song ) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत ‘शिवबाचं गाणं’ हे गाणं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. सर्व सामान्य प्रजा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मधील अतूट नाते, या गाण्यातून दाखवण्यात आले आहे.
चव्हाणांच्या राजीनाम्याचे नगरमध्ये पडसाद, काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या व्यासपीठावर
जबरदस्त नृत्य, पाय थिरकायला लावणारे संगीत, शिवकालीन माहौल अशा अनेक गोष्टींनी सजलेले हे गाणे, अल्पावधीतच प्रसिद्ध झाले आहे. या गाण्याच्या संगीताला आणि भव्य चित्रीकरणाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या गाण्यात अंबाबाई चे गोंधळ आहे, ज्या गोंधळाला स्वतः महाराज त्यांच्या पत्नी महाराणी सईबाई सोबत येतात. हा थरारक गोंधळ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता हे मराठमोळं गाणं शिवजयंतीनिमीत्त थेट परदेशात वाजणार आहे.
NCP Crises : अजितदादांचा राग पण कोल्हे थेट लंकेंच्या मंचावर झळकणार, लोकसभेपूर्वीच लंकेंचे ‘महानाट्य’
‘बिग हिट मीडिया’ प्रस्तुत, प्रशांत नाकती यांचे संगीत असलेले ‘शिवबाचं गाणं’ हे गाणं निर्माते हृतिक अनिल मनी व अनुष्का अविनाश सोलवट यांनी निर्मित केले आहे. या सॉंगच्या निर्मितीसाठी सोमनाथ घारगे (पोलिस अधिक्षक रायगड) आणि श्रीकांत देसाई (ND Studio) यांचे विषेश सहकार्य लाभले. ‘शिवबाचं गाणं’ हे गाणं महाराष्ट्रातील आघाडीचे गायक आदर्श शिंदे व ट्रेंडिंग गायिका म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली सोनावणे यांनी गायले आहे. तर सुप्रसिद्ध संगीतकार प्रशांत नाकती व संकेत गुरव यांनी या गाण्याच्या संगीताची धुरा सांभाळली आहे.
“शिवबाचं नाव” या गाण्याच्या दिग्दर्शनाची व छायाचित्रणाची दुहेरी जबाबदारी अभिजीत दाणी याने उत्तमरीत्या साकारली आहे. या गाण्यात महाराष्ट्रातील तरुण प्रेक्षकांचे आवडते कलाकार विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळे, तृप्ती राणे आणि वैष्णवी पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘शिवबाचं गाणं’ या गाण्यात छत्रपती महाराजांच्या भूमिकेत लोकप्रिय मराठमोळा अभिनेता विशाल निकम याला पाहणं रंजक ठरलं. महाराणी सईबाईंच्या भूमिकेतून अनुष्का सोलवट हिने मराठी कला क्षेत्रात पदार्पण केले आहे तर सुभेदार म्हणुन अविनाश सोलवट यांनी भूमिका केली आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन चेतन महाजन (नानू) आणि चेतन शिगवण यांनी केले आहे.अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत असलेलं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात सध्या सर्वत्र वाजत असलेलं हे गाणं आता शिवजयंतीला परदेशातील रहिवाश्यांच्या मनावर राज्य करण्यासही तयार आहे.