Shraddha Kapoor Eetha Song Ji Ji Re Ji: ‘ईठा’च्या ट्रेलरने सोशल मीडियावर आधीच जोरदार हवा केली असताना, आता श्रद्धा कपूरच्या ‘जी जी रे जी’ या नव्या गाण्याने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. नुकतंच दिल्लीत एका दिमाखदार सोहळ्यात लॉन्च झालेल्या या गाण्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. श्रद्धाचे नजाकतीने भरलेले लावणीचे ठेके, जबरदस्त हावभाव आणि सहजसुंदर स्क्रीन प्रेझेन्स पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
Tunnel Men : तब्बू वाईआरएफ एंटरटेनमेंटच्या नेटफ्लिक्स सीरिज ‘टनल मेन’मध्ये झळकणार
नॅशनल अवॉर्ड विजेती संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध, अरेंज, कंडक्ट आणि प्रोड्यूस केलेल्या या गाण्याला अमिताभ भट्टाचार्य यांचे शब्द लाभले आहेत, तर श्रेया घोषालच्या सुरांनी गाण्यात आणखी रंग भरला आहे. ताकद, जिद्द आणि एका दंतकथेच्या घडण्याचा प्रवास साजरा करणारं हे गाणं वैभवी मर्चंट यांनी कोरिओग्राफ केलं आहे. श्रद्धा आपल्या लावणीच्या ठसकेबाज अदांनी, नजरेच्या कटाक्षांनी आणि दमदार रंगमंचीय उपस्थितीने ‘ईठा’च्या दुनियेत अक्षरशः जीव ओतताना दिसते.
गाणं रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. श्रद्धाची मेहनत, तिचा नृत्याविष्कार, संगीत आणि कोरिओग्राफी यांचं भरभरून कौतुक होत असून नेटकरी वेगवेगळ्या कमेंट्समधून आपला उत्साह व्यक्त करत आहेत.
एका चाहत्याने कमेंट केली, “श्रद्धा कपूर – नॅशनल अवॉर्ड लोडिंग!” तर दुसऱ्याने लिहिलं, “८ वर्षांनंतर अजय-अतुल आणि अमिताभ यांची धमाकेदार जोडी पुन्हा एकदा आली आहे. काय भन्नाट गाणं आहे! अंगावर काटा आणणारं संगीत, वैभवी मर्चंट यांची जबरदस्त कोरिओग्राफी आणि श्रद्धाची मेहनत सगळंच अप्रतिम!”
आणखी एका चाहत्याने लिहिलं, “परफेक्शन!! ४ डिसेंबरला #Eetha मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता अजिबात वाट बघवत नाहीये.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, “श्रद्धा पुन्हा एकदा ईठाच्या रूपात परतली आहे. बॅकग्राउंड स्कोअर तर जबरदस्त!”
‘मान’ मधून उमटणार स्त्रीशक्तीचा सामूहिक हुंकार; 4 जूनला चित्रपट होणार प्रदर्शित
एका चाहत्याने जुन्या डायलॉगची आठवण करून देत म्हटलं, “एकदा एक लेजेंड म्हणाला होता – ‘वो स्ट्रेस है, कुछ भी कर सकती है!’ श्रद्धाने ‘जी जी रे जी’ सादर केलं नाही, तर ती त्या गाण्यात पूर्णपणे जगली आहे. तिचं नृत्य असो वा एक्स्प्रेशन्स, सगळंच कमाल!”
तर आणखी एका चाहत्याने सगळ्या उत्साहाचा सार एका ओळीत मांडला, “श्रद्धा कपूर + श्रेया घोषाल + अजय-अतुल + मॅडॉक = बॉलिवूड जॅकपॉट!”
सोशल मीडियावर गाण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून, ‘ईठा’बद्दलची उत्सुकताही आता शिगेला पोहोचली आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजान, लक्ष्मण उतेकर व करिश्मा शर्मा निर्मित ‘ईठा’ हा चित्रपट 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
