Download App

कन्फर्म ! श्रद्धा कपूर राहुल मोदीच्या प्रेमात पडली? अभिनेत्री कोणाला करतेय डेट? जाणून घ्या…

Shraddha Kapoor Photos Confirm Relationship: सध्या श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. (Shraddha Kapoor Photos) अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगच्या दरम्यान विमानतळावर श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी (Rahul Modi) एकत्र दिसले तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.


प्री-वेडिंग व्यतिरिक्त दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दोन्ही बाजूंनी शेअर केलेली नाही. पण आता श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केलेले फोटो पाहता दोघेही लवकरच आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगितले जात आहेत. श्रद्धाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाचा नाईट ड्रेस घातला आहे. पण तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते तिच्या गळ्यातील पेंडलने. याच पेंडलमध्ये ‘आर’ लिहिले असल्याचे दिसत आहे.

हे पाहून चाहते म्हणत आहेत की श्रद्धा कपूरच्या गळ्यातला आर हा राहुल मोदींसाठी आहे. मात्र, श्रद्धाने कॅप्शन लिहिले, “काही नाही, रविवार आहे, त्यामुळे मी काहीही करत नाही.” आता चाहत्यांनी या फोटोंवर भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, “या ‘R’ नावाच्या लॉकेट GG चे रहस्य काय आहे?” तर दुसऱ्याने लिहिले की, “R for Richard” ज्यावर श्रद्धाने पहिली प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “अरे, पण नाही” यासोबतच आणखी एका यूजरने विचारले आहे की, “तुम्ही राहुल मोदींना याची पुष्टी मानता का?, अशा भन्नाट प्रतिक्रिया आणि कॉमेंट्स सध्या पाहायला मिळत आहेत.

त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट पण… धुळवडीनिमित्त कुशल बद्रिकेची भावूक पोस्ट

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी लवकरच त्यांच्या नात्याची पुष्टी करणार असल्याचे बोलले जात आहे. श्रद्धाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची रणबीर कपूरसोबत ‘तू झुठी मैं मकर’ या चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच अमर कौशिकच्या कॉमेडी हॉरर चित्रपट ‘स्त्री 2’ मध्ये पंकज त्रिपाठी आणि राजकुमार रावसोबत दिसणार आहे.

follow us