त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट पण… धुळवडीनिमित्त कुशल बद्रिकेची भावूक पोस्ट

त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट पण… धुळवडीनिमित्त कुशल बद्रिकेची भावूक पोस्ट

Kushal Badrike : आज राज्यभर होळी सणाच्या तसेच धुळवडीच्या निमित्त उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं. यामध्येच अनेक कलाकारांनी धुळवडीनिमित्त रंगोत्सवाचा आनंद घेतला. यावेळी चला हवा येऊ द्या फेम विनोदी अभिनेता कुशल बद्रिके ( Kushal Badrike) यांनी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्याने त्याच्या बालपणीच्या धुळवडीबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

ISRO PSLV Module 3 : इस्रोचं रॉकेट अंतराळात कचरा न सोडता पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत दाखल

या पोस्टमध्ये कुशल म्हणाला की, माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष “फ्लॅट” संस्कृतीत पेटत्ये, पण माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या “चाळीत”. माझे पप्पा पहाटे चारला उठायचे आणि दिड-दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे. मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची. त्या वेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते, म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करुन टाकलं. आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं “पप्पांचं बोट” आपल्याच हाताला फुटलंय असं वाटतं आणि आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव ठुसठुसत राहते बोटभर !!! ( :- सुकून )

अभिनेता कुशल बद्रिकेबद्दल सांगायचं झालं तर चला हवा येऊ द्या कार्यक्रमामुळे कुशल बद्रिकेत घराघरात पोहोचला. विनोदाचा अचूक टायमिंग साधत त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या अभिनेता सोनी टीव्हीवरील मॅडनेस मचायेंगे या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. तसेच सोशल मीडियावर देखील कुशल तेवढाच सक्रिय असतो. वेगवेगळ्या विषयांवर तो त्याच्या पोस्ट शेअर कर करत असतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube