Download App

श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ मधील अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने

Shreya Chaudhary wins Best Actress Award at IIFA Digital Awards 2025: तरुण अभिनेत्री श्रेया चौधरी (Shreya Chaudhary) तिच्या दमदार अभिनयासाठी चर्चेत आहे. बंदिश बँडिट्स सीझन 2 मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. IIFA डिजिटल पुरस्कार 2025 मध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (Best Actress Award) (मुख्य भूमिका) – वेब सिरीजचा बहुमान मिळाला आहे.

साहेब मला माफ करा; पुण्यातील रस्त्यावर लघूशंका करणाऱ्या गौरव आहुजाचे कोणते शिंदे साहेब?

श्रेया चौधरी म्हणाली, ही ओळख मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आणि आनंदित आहे. त्यामुळे मला अधिक चांगली पात्रे साकारण्याची संधी मिळेल आणि या इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करता येईल.’बंदिश बँडिट्स सीझन 2′ (Bandish Bandits Season 2) हा एक विलक्षण अनुभव होता. संगीत, भावना आणि कथा यांचं सुंदर मिश्रण असलेल्या या प्रोजेक्टचा भाग होणं माझ्यासाठी कायम खास राहील.

‘तमन्ना’ हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आवडत पात्र राहील. मी या शोचे निर्माते अमृतपाल सिंग बिंद्रा, आनंद तिवारी आणि साहिरा नायर यांचे मनःपूर्वक आभार (Entertainment News) मानते. हा पुरस्कार माझ्या मेहनतीचा आणि समर्पणाचा मोठा सन्मान आहे. अभिनयासाठी मी नेहमीच पूर्ण समर्पणाने काम करत आले आहे. माझे अभिनयासोबत एक शुद्ध, आध्यात्मिक नाते आहे. मी या कलेत अधिकाधिक प्रावीण्य मिळवू इच्छिते.

पुन्हा एकदा छाया कदम चर्चेत ! बड्या ज्वेलरी ब्रँडसाठी बनल्या खास चेहरा

‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ साठी श्रेया चौधरी हिला मिळालेला हा दुसरा सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकतेच, श्रेया चौधरी हिने बोमन इराणी दिग्दर्शित ‘द मेहता बॉयज’ चित्रपटात अविनाश तिवारी सोबत भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे.

 

follow us