पुन्हा एकदा छाया कदम चर्चेत ! बड्या ज्वेलरी ब्रँडसाठी बनल्या खास चेहरा

पुन्हा एकदा छाया कदम चर्चेत ! बड्या ज्वेलरी ब्रँडसाठी बनल्या खास चेहरा

Chhaya Kadam became face for big jewellery brand : अभिनेत्री छाया कदम (Chhaya Kadam) आणखी एका खास गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत. त्या एका बड्या ज्वेलरी ब्रॅंडसाठी खास चेहरा बनल्या आहेत. जगभरात ज्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली उत्तम काम केलं आणि एक मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) जगाच्या पाठीवर जाऊन पोहचली, ती म्हणजे छाया कदम.

पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवलं तर ते भुंकतात

गेल्या काही वर्षांपासून छायाने तिच्या कमालीच्या अभिनयाने स्वतःचं वेगळं पण सिद्ध करत अनेक उत्तम प्रोजेक्ट्ससोबत बॉलिवुड (Bollywood) गाजवलं. काल 8 मार्च रोजी महिला दिनाच्या दिवशी त्या एका मोठ्या ज्वेलरी ब्रँडचा महत्त्वपूर्ण चेहरा बनल्या आहेत.

खरंतर सध्या मोठ्या मोठ्या ब्रँड्स ना देखणी, मॉर्डन असलेली अभिनेत्री लागते. पण हाच विचार मोडून काढत छाया कदम एका मोठ्या ब्रँडचा महत्त्वपूर्ण भाग झाल्या (Entertainment News) आहेत. ज्वेलरी ब्रँड म्हटलं की, सगळ्यांना डोळ्यासमोर एखादी मोठी अभिनेत्री किंवा मॉडेल दिसते. पण यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने छाया कदम या त्यांच्या अभिनयाचं सोनेरी रूपाने या ब्रँडचा खास चेहरा झाल्या आहेत.

“राजकारणाचा चिखल झालाय, कामचुकारपणा केला तर..” राज ठाकरेंच्या रडारवर कोण?

छाया कदम हे नाव साता समुद्रापार पोहचलं खरं, पण भारतात देखील आज हे नाव तेवढ्याच ताकदीने घेतलं जातंय. त्यांच्या अभिनयाचं वेगळेपण
सगळ्यांना आपसूक मोहून जातंय. छाया ताईंनी आजवर अनेक महत्त्वपूर्ण भूमिका अगदी ताकदीने पार पाडल्या. त्यांनी बॉलिवुडच्या सोबतीने जगभरात स्वतःची वेगळी ओळख संपादन केली.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने छाया कदम हा चेहरा पुन्हा एकदा चर्चेत आला. छाया कदम एका बड्या ज्वेलरी ब्रँडचा महत्त्वपूर्ण भाग झाल्या आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube