Bardovi : अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण; आगामी सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज

Bardovi : अभिनेत्री छाया कदम यांचं आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण; आगामी सिनेमाचं हटके पोस्टर रिलीज

Chhaya Kadam Upcoming Poster Release: दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी सिनेमातून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलीकडेच त्यांची भूमिका असलेला सिनेमा कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरला होता. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या कारकिर्दीत नवं वळण आलं आहे. ‘बारदोवी’ या (Bardovi Movie) आगामी सिनेमाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून त्या या सिनेमात मुख्य भूमिकेतही आहेत. 2 ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा सिनेमा रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)


‘बारदोवी’ या (Bardovi Movie) आगामी हिंदी सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. सतोरी एन्टरटेन्मेंट प्रस्तुत बारदोवी या (social media) सिनेमाची निर्मिती कृष्णार्पण मोशन पिक्चर्स, शुभारंभ मोशन पिक्चर्स यांनी केली आहे. अमित जाधव, अर्जुन जाधव, प्रणित माणिक शिवाजी वायकर, संदीप बाबूराव काळे, एल्विन राजा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर छाया कदम सहनिर्मात्या आहेत. तर संतोष बळीराम तांबे, रविराज शिवाजी वायकर, अभिजित सुमन वसंत पाटील, नितीन पाटील सहायक निर्माता आहेत.

करण शिवाजीराव चव्हाण यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण विक्रम पाटील यांनी केलेले आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून विकास डीगे हे आहेत. छाया कदम यांच्यासह सिनेमात चित्तरंजन गिरी, विराट मडके यांच्यासारखे कसलेले कलावंत आहेत.

Hindi Movie : ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

चित्रपटाच्या पोस्टरवर शाल पांघरून करारी नजरेनं पाहणारी स्त्री दिसते. ही भूमिका छाया कदम यांनी साकारली आहेत. छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका वेगळी आहे आणि सर्वच भूमिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. छाया यांची आजवरची कारकिर्द पाहता त्यांनी निर्मितीसाठी आणि अभिनेत्री म्हणून निवडलेला बारदोवी हा चित्रपट त्याच धाटणीचा असल्याचा अंदाज पोस्टर पाहून बांधता येतो. सिनेमाचं पोस्टर अत्यंत लक्षवेधी आहे. त्यामुळे आता 2 ऑगस्टला चित्रपट मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा प्रेक्षकांना करावी लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज