Download App

Shreyas Talpade: जितेंद्र जोशीनं सांगितलेली आठवण ऐकून श्रेयस झाला भावूक; म्हणाला, ‘स्वामींच्या मठात…’

Khupte Tithe Gupte: गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. या कार्यक्रमाच्या दरम्यान दुसऱ्या एपिसोडमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा हजेरी लावला आहे. सध्या ‘खुप्ते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


या प्रोमोमध्ये दिसत आहे की, ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये श्रेयसचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशी ( Jitendra Joshi) हा एक आठवण सांगत असल्याचे दिसून येत आहे. ती आठवण ऐकून श्रेयस हा भावूक झाला असल्याचे फासून आला आहे. खुप्ते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, जितेंद्र जोशी हा एका व्हिडीओमध्ये श्रेयससोबतची एक आठवण चाहत्यांना सांगत असल्याचे दिसून आला आहे.

तो म्हणतो की, ‘श्रेयस, मनामध्ये अनेक भावना आहेत. मला जेव्हा काम नव्हते, त्यावेळेस सतीश राजवाडे या आपल्या मित्राकडे असिस्टंट म्हणून मला घेऊन जाणारा तोच होता. मला एक किस्सा आठवत आहे, जेव्हा तुझ्या आईने तुला सांगितले होतं की, आता नोकरी कर या नाटकामध्ये काही होत नाही. तेव्हा आपण दोघे मिळून स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो आणि आपण प्रार्थना केला होती. तसेच जितेंद्रनं सांगितलेली ही आठवण ऐकून श्रेयस हा भावूक झाला असल्याचे दिसून आले आहे, असे या प्रोमोच्या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

OMG 2 Release Date : ‘या’ दिवशी येणार ‘ओह माय गॉड 2’, अक्षय कुमार दिसणार नव्या अवतारात

‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा आणखी एक प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसत आहे की, श्रेयस म्हणतो, ‘मला एका सीरिअलच्या ऑडिशनसाठी बोलावले होते. तेव्हा मी बोलायला सुरुवात करणार तितक्यातच कॅमेरामन म्हणाला, थांब, प्रॉब्लेम झाला आहे. अर्धा तास गेला तरी कॅमेरा काही सुरु होत नव्हता. तेव्हा तो कॅमेरामन मला म्हणाला की’पनौती है ये’ मला तेव्हा वाटलं असेन मी कादाचित पनौती कारण माझ्याकडे त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे काम नव्हते.

श्रेयस हा सिरीयल आणि सिनेमामधून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. इक्बाल, पोस्टर बॉईज, गोलमाल 3, ओम शांती ओम यांसारख्या हिट सिनेमामध्ये काम केले आहे. तसेच त्यानं ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या सीरियलमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिरीयलमधील त्याच्या अभिनयाला चाहत्यांनी मोठी पसंती मिळाली आहे. श्रेयसच्या आगामी सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत.

Tags

follow us