OMG 2 Release Date : ‘या’ दिवशी येणार ‘ओह माय गॉड 2’, अक्षय कुमार दिसणार नव्या अवतारात

OMG 2 Release Date : ‘या’ दिवशी येणार ‘ओह माय गॉड 2’, अक्षय कुमार दिसणार नव्या अवतारात

OMG 2 Release Date : 2012 मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट अत्यंत गाजला होता. या यशस्वी चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ‘ओह माय गॉड’ मध्ये अक्षयने भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता ‘ओह माय गॉड 2’ मध्ये तो भगवान शिवाच्या अवतारात दिसणार आहे. (OMG 2 Release Date Declared by Akshay Kumar )

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या चित्रपटाच्या पोस्टरने चाहत्यांना प्रचंड प्रभावित केले आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या अक्षय कुमारसह यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. तर स्वतः अक्षय कुमारने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. त्यामध्ये या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

Jitendra Joshi: जितूची लेकीसाठी खास पोस्ट; म्हणाला, ‘ती १३ महिन्यांची होती तेव्हा मी…

हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 ला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर शेअर करताना आणि रिलीज डेटबद्दल माहिती देताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहीले की, आम्ही येत आहोत, तुम्हीही या. 11 ऑगस्ट. तर या पोस्टरमध्ये तो भगवान शिवाच्या रूपात दिसला आहे. तर अभिनेत्री यामी गौतमने देखील हे पोस्टर शेअर केले आहे. ती म्हणाली की, ‘तारीख लॉक आहे! OMG2 11 ऑगस्ट, 2023 ला चित्रपटगृहामध्ये रिलीज होत आहे. तेथे भेटू!’

‘Adipurush’ सिनेमाची १० हजार तिकिटे फ्री देणार! बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्मात्याचा मोठा निर्णय

या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर हा चित्रपट भारतात सेक्स एज्युकेशनच्या अभावाच्या विरोधात आहे. तर अश्विन वर्दे, वायकॉम 18, आणि Jio स्टुडिओ यांनी या चित्रपटाचं प्रोडक्शन केले आहे. अक्षय कुमारने मध्यप्रदेशमध्ये ऑक्टोबर 2021 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू केल होतं. त्यानंतर त्याने या चित्रपटाचं फर्स्ट लूक रिलीज केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube